Fact Check : अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मोदींकडे दुर्लक्ष केलं? थांबा, व्हीडीओ फॉरवर्ड करण्यापूर्वी पूर्ण बघा…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इग्नोर केल्याचं बोललं जातंय. या मागचं खरं सत्य काय आहे? जाणून घेऊयात...
मुंबई : आपल्या देशाचे इतर देशांसोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध असावेत, यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. आंतरराष्ट्रीय संबंध चांगले राखण्यासाठी ते इतर देशांच्या दौऱ्यावर गेलेले पाहयला मिळतात. अमेरिका आणि भारताचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना इग्नोर केल्याचं बोललं जातंय. या मागचं खरं सत्य काय आहे? जाणून घेऊयात…
अँथनी अल्बानी यांची नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचं अभिनंदन करण्यासाठी क्वाडचे सदस्य एकत्र आले होते. त्यावेळी हा व्हीडिओ काढण्यात आला. ज्यात जो बायडन यांनी मोदींना टाळल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हीडिओ राहुल गांधी यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात मोदींना इग्नोर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. बायडन यांचा टॅग करत आमच्यात मतभेद आहेत पण तुम्ही त्यांना असं टाळू शकत नाही, असं म्हणण्यात आलं आहे.
Mr. @POTUS , he represents our 1.4 billion people, some of us may have differences with him at home, but you got no business to insult & ignore him repeatedly. We expect respect & dignity. pic.twitter.com/YZPeA9xpjA
— Rofl Gandhi 2.0 ? (@RoflGandhi_) May 24, 2022
वास्तव काय आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इग्नोर केल्याचं बोललं जातंय. पण या मागचं खरं सत्य काहीसं वेगळं आहे. अँथनी अल्बानी यांचं अभिनंदन केल्यानंतर काही वेळात बायडन आणि मोदी यांच्यात एक बैठक झाली यात बायडन यांनी मोदींशी विविध विषयांवर चर्चा केली. शिवाय त्यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे या व्हीडिओत जरी बायडन यांनी मोदींकडे पाहिलं नसलं, त्यांच्याशी बोलले नसले तरी नंतर दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे मोदींना टाळल्याचा दावा फक्त हा व्हीडिओ पाहून केला जाऊ शकतो. पण वास्तव वेगळं आहे.