अमेरिकन कंपनीची जॉब ऑफर, नेटफ्लिक्स पाहण्यासोबत पिझ्झा खा आणि 40 हजार कमवा

एखादी कंपनी चित्रपट पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी पगार देत असेल तर..(BonusFinder Company Job Offer For Watch Netflix and Eat Pizza)

अमेरिकन कंपनीची जॉब ऑफर, नेटफ्लिक्स पाहण्यासोबत पिझ्झा खा आणि 40 हजार कमवा
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 6:54 PM

मुंबई : जर तुम्ही चित्रपट पाहण्यासोबत पिझ्झा खाण्याचे शौकीन असाल, तर तुम्हाला त्यासाठी सर्रास पैसे खर्च करावे लागतात. पण जर तुम्हाला एखादी कंपनी चित्रपट पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी पगार देत असेल तर.. आश्चर्य वाटतं ना…पण ही हे खरं आहे. (BonusFinder Company Job Offer For Watch Netflix and Eat Pizza)

अमेरिकेतील एक कंपनीकडून अनोख्या जॉबसाठी जाहिरात काढली आहे. यात कंपनी तुम्हाला नेटफि्लक्स पाहण्यासाठी आणि पिझ्झा खाण्यासाठी पैसे देणार आहे. BonusFinder असे या अमेरिकेतील एका वेबसाईटचे नाव आहे. ही वेबसाईट काही चित्रपट, मालिका आणि शो चे परीक्षण करते.

या वेबसाईटने नुकतंच एक जाहिरात काढली आहे. या वेबसाईटला Netflix वर जास्तीत जास्त शो बघणारा आणि पिझ्झा खाणारा व्यक्तीची गरज आहे. या नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारांना एखाद्या शोचे कथा, त्याची स्टोरी, अभिनयाची गुणवत्ता याचा आढावा घ्यायचा आहे. यातील काही भाग्यवान विजेत्यांना पिझ्झा खाण्यासाठी आणि तीन नेटफ्लिक्स शो पाहण्यासाठी 37 हजार रुपये दिले जातील.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

BonusFinder या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये लॉकडाऊननंतर अनेक बदल पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही एक नवी टीम तयार करत आहोत. यासाठी आम्हाला नवीन लोकांची गरज आहे. या नोकरीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांना केवळ नेटफ्लिक्स पाहायचं आहे. नेटफ्लिक्सवरील शो पाहताना तुम्ही खाण्यासाठी जे काही ऑर्डर कराल, त्याचे पैसे तुम्हाला कंपनी देईल, असेही या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

12 तास चप्पल घाला, 4 लाख कमवा

दरम्यान काही दिवसांपूर्वी Bedroom Athletics या कंपनीने Slipper Tester या पदासाठी अर्ज मागवले होते. या जाहिरातीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीने गेल्यावर्षीही अशाप्रकारे Slipper Tester या पदासाठी अर्ज मागवले होते. त्यावेळीही या जाहिरातीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

सध्या प्रसिद्ध केलेली ही जाहिरात दोन पदांसाठी आहे. एक महिला आणि एक पुरुष अशा दोन व्यक्तींसाठी ही जाहिरात आहे. या कंपनीने दिलेल्या जाहिरातीनुसार, तुम्हाला फक्त कंपनीला चप्पल घालून तुमचा अनुभव शेअर करावा लागणार आहे. यासाठी कंपनी तुम्हाला वर्षाला 4 लाख 20 हजार रुपये देणार आहे. म्हणजे महिन्याला साधारण 35 हजार रुपये मिळणार आहे. (BonusFinder Company Job Offer For Watch Netflix and Eat Pizza)

संबंधित बातम्या : 

12 तास चप्पल घाला, 4 लाख कमवा; ‘ही’ कंपनी देतेय घर बसल्या जॉब

Vedic Paint | शेणा-मातीच्या काल्याला आधुनिक टच, गडकरींच्या हस्ते वैदिक रंगाचं लाँचिंग

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.