एक नाही, दोन नाही, सतरावं मुल जन्माला घालण्याची तयारी, बाईची तऱ्हाच न्यारी !

अमेरिकेत एक असं जोडपं आहे ज्यांना मुलांना जन्माला घालण्याचं जणू वेडच लागलंय. या जोडप्यानं नुकतंच 16 व्या मुलाला जन्म दिलाय आणि त्यांनी लगेचच 17 व्या बाळाची तयारी करायला सुरुवात केलीय.

एक नाही, दोन नाही, सतरावं मुल जन्माला घालण्याची तयारी, बाईची तऱ्हाच न्यारी !
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 3:24 AM

वॉशिंग्टन : जगभरात लोकसंख्या वाढीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्याचमुळे काही देशांमध्ये एकाच मुलाला, तर कुठं 2 मुलांनाच जन्म देण्याची परवानगी आहे. ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ ही घोषणा तर भारतात गाजलीय. मात्र, अमेरिकेत एक असं जोडपं आहे ज्यांना मुलांना जन्माला घालण्याचं जणू वेडच लागलंय. या जोडप्यानं नुकतंच 16 व्या मुलाला जन्म दिलाय आणि त्यांनी लगेचच 17 व्या बाळाची तयारी करायला सुरुवात केलीय. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडप्याची जोरदार चर्चा आहे. अनेकजण या बाईची नेमकी कोणती तऱ्हा आहे असंच विचारत आहेत (American couple give birth to 16th child and planning to have 17th).

अमेरिकेतील 16 बाळांना जन्म देऊन 17 व्या बाळाला जन्म देण्यासाठी इच्छूक असलेल्या या 39 वर्षाच्या महिलेचं नाव पेटी आहे. तिने नुकताच आपल्या सोळाव्या बाळाला जन्म दिला. या प्रसुतीच्या वेदना विसरण्याच्या आधीच या महिलेने पुन्हा एका बाळाची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे ऐकणारे अवाक होत आहेत. बाळाला जन्म देणं म्हणजे आपल्याकडे त्या स्त्रीचा पुनर्जन्म मानला जातो. याचं कारण प्रसुती होणारी स्त्री इतक्या वेदनांमधून जाते की बाळाला जन्म दिल्यानंतर तिचा नवा जन्मच झालाय असं समजलं जातं. मात्र, पेटीला या वेदनांपेक्षा बाळाला जन्म देणंच अधिक महत्त्वाचं आहे.

इतक्या मुलांना जन्म देण्यामागे या महिलेची भावना काय?

पेटीच्या पतीचं नाव कार्लोस असं आहे. तो 38 वर्षांचा म्हणजेच पेटीपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. या जोडप्याला इतक्या मुलांना जन्म देण्याचं कारण विचारलं असता त्यांनी गर्भधारणा राहणं, बाळाला जन्म देणं आणि मोठं कुटुंब होणं म्हणजे देवाचा आशिर्वाद आहे. पेटीने तिला मुलाला जन्म देताना आनंद होतो असंही म्हटलं आहे. तसेच देवाची इच्छा असेल तर मला पुन्हा एकदा गर्भधारणा राहिल, असंही ती सांगते. इतकी मुलं ही पती कार्लोसकडून मिळालेलं गिफ्ट असल्याचं ती मानते. या जोडप्याने आपल्या सर्व मुलांची नावं सी (C) या आद्याक्षरावरुन ठेवली आहेत. नव्या बाळाचं नावंही या अक्षरावरुन ठेवण्यात आलंय.

16 व्या बाळाला जन्म देताना पेटी थोडक्यात बचावली

विशेष म्हणजे पेटी बाळाला जन्म देताना आनंद होत असल्याचं सांगत असली तरी 16 व्या बाळाला जन्म देताना तिची अवस्था गंभीर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितंय. अगदी जीव वाचवणं देखील कठीण झालं, मात्र अनेक प्रयत्नांनंतर पेटीचा जीव वाचवू शकलो असंही त्यांनी नमदू केलंय. त्यामुळे नुकत्याच झालेल्या प्रसुतीत अगदी थोडक्यात जीव वाचलेल्या पेटीनं 17 व्या मुलाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःहून आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्याचा प्रकार मानला जातोय.

हेही वाचा :

वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो

गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण

Video | गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर महिला पोलिसांचा धम्माल डान्स, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहा :

American couple give birth to 16th child and planning to have 17th

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.