‘असे’ आनंदाचे क्षण नवी आशा देतील? रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ‘हा’ भावुक video होतोय Viral
Russia Ukraine war : युक्रेन आणि रशिया यांच्यात सलग 12व्या दिवशी विनाशकारी युद्ध (War)सुरू आहे. दरम्यान, येथील लविव रेल्वे स्थानकावर (Lviv station) एका महिलेचा पियानो (Piano) वाजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, जो भावुक करेल.
Russia Ukraine war : भीषण बॉम्बस्फोटात अनेक घरे उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, लोक शेजारच्या देशांमध्ये सुरक्षित आश्रयस्थानाच्या शोधात इकडे तिकडे धावत आहेत… युक्रेनमधील ताज्या परिस्थितीचे चित्र पाहून जगभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सलग 12व्या दिवशी विनाशकारी युद्ध (War)सुरू आहे. एकीकडे रशिया बॉम्ब फेकत असताना युक्रेनही मागे नाही. त्याने रशियाचेही मोठे नुकसान केले आहे. तथापि, युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये सर्वत्र विनाशकारी चित्र दिसत आहे. दरम्यान, येथील लविव रेल्वे स्थानकावर (Lviv station) एका महिलेचा पियानो (Piano) वाजवत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. त्याचवेळी चिंताग्रस्त आणि हताश झालेले लोक आजूबाजूला असताना हा व्हिडिओ खूप भावुक करत आहे. 5 फेब्रुवारीला ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स भावुक होत आहेत.
आश्रय घेण्यासाठी धावपळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला युक्रेनमधील लविव रेल्वे स्टेशनबाहेर गायक लुईस आर्मस्ट्राँगचे ‘व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड’ गाणे पियानोच्या सुरात वाजवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही चिंताग्रस्त आणि अस्वस्थ लोक युद्धातून सुटण्यासाठी आश्रय घेण्यासाठी धावपळ करताना पाहू शकता. हे दृश्य आणि पियानोचे सूर लोकांना खूप भावुक करत आहेत. दरम्यान, पूर्व युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यांमुळे झालेल्या विनाशानंतर ही जागा निर्वासितांनी भरलेली आहे.
Outside Lviv station, which is thronging with exhausted refugees fleeing war in eastern Ukraine, an accomplished pianist is playing “What a Wonderful World.” It’s hauntingly beautiful. pic.twitter.com/Xm5itr8jl7
— Andrew RC Marshall (@Journotopia) March 5, 2022
ट्विटरवर शेअर
शनिवारी संध्याकाळी ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या 41 सेकंदांच्या या व्हिडिओला लोक लाइक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओ पोस्टला 1 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 27 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
यूझर्स झाले भावुक
हा व्हिडिओ पाहून बहुतांश लोक भावुक झाले आहेत, तर काही यूझर्सनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. लोकांचे म्हणणे आहे, की ही महिला केवळ मीडियावर राहण्यासाठी हे करत आहे. काहीही असो. युक्रेनमधील ताजी परिस्थिती पाहता असे म्हणता येईल, की असे आनंदाचे क्षण लोकांना नवी आशा देतात.