Amruta Fadnavis Song | रोज रोज पाठीमागे… अमृता फडणवीसांच्या गळ्यात ‘जॅझ’ सुरावट

अमृता फडणवीसांनी गायलेलं, जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं अंधार चित्रपटातील हे गाणं जॅझ पद्धतीचं आहे Amruta Fadnavis Jazz song Andhaar

Amruta Fadnavis Song | रोज रोज पाठीमागे... अमृता फडणवीसांच्या गळ्यात 'जॅझ' सुरावट
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 3:00 PM

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी गाणं (Andhaar Daav Movie Song) गायलं आहे. या गाण्याच्या संगीतातून सिनेमात गूढ विषय हाताळल्याचं दिसतं. सोशल मीडियावर मिसेस फडणवीसांना संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. (Amruta Fadnavis presents Jazz song from Andhaar Movie)

जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

गुलशन-सागरिकाची जोडी झळकणार

हंटर चित्रपटातील मंदार पोंक्षे या मराठमोळ्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गुलशन देवय्या (Gulshan Devaiah) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर चक दे इंडिया, प्रेमाची गोष्ट अशा सिनेमांमध्ये झळकलेली, क्रिकेटपटू झहीर खानची पत्नी- अभिनेत्री सागरिका घाटगेही (Sagarika Ghatge) पुन्हा मराठी सिनेमात झळकणार आहे.

‘तिला जगू द्या’ची वाहवा

अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO : तिला जगू द्या… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

(Amruta Fadnavis presents Jazz song from Andhaar Movie)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.