ह्या कलाकृतीला सलाम! अक्रोडच्या आत बनवले आलिशान घर; कौशल्य पाहून तुम्हीही चकित व्हाल

या व्हिडिओला 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 1 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ह्या कलाकृतीला सलाम! अक्रोडच्या आत बनवले आलिशान घर; कौशल्य पाहून तुम्हीही चकित व्हाल
ह्या कलाकृतीला सलाम!Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 10:56 PM

हल्लीच्या डिजिटल युगात बरेचजण सोशल मीडियामध्ये आपल्या कला सादर करत असतात. रिल्स बनवण्याचे फॅड अनेक तरुण-तरुणींना भुरळ घालते. यातही अनेक असे कलाकार आहेत, जे आपल्या जुन्या आवडीनिवडी तितक्याच आत्मीयतेने जपत आहेत. अनेक कलाकार (Artist) टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळे कलाकृती बनवतात, तर अनेक कलाकार लाकडावर, दगडांवर, भिंतीवर कलाकृती रेखाटून लोकांची वाहवा मिळवतात. गेल्या काही दिवसांमध्ये एक कलाकृती (Artwork) प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. ही कलाकृती ना दगडावर कोरलेली, ना लाकडावर. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे, कलाकाराने चक्क अक्रोडमध्ये आलिशान घर (Luxury Home in Walnut) बनवले आहे.

छोट्याशा अक्रोडमध्ये घर, त्यात सुंदर टेबल, पुस्तके, प्राणी हा सगळा आलिशान माहोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसत आहे. प्रत्येक जण या कलाकृतीला सलाम देत आहे.

हे सुद्धा वाचा

ट्विटरवर मिळते भरभरून दाद

अक्रोडमध्ये बनवलेले घर सोशल मीडियात चांगलीच दाद मिळवत आहे. खरंतर सोशल मीडियामध्ये विशेषतः ट्विटरवर पशुपक्ष्यांचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. छोट्या जीवांच्या गोंडस हालचाली ट्विटर युजर्स नाव भुरळ घालतात. याचवेळी काही कलाकृतीही ट्विटर युजर्सचे लक्ष वेधून घेते.

अक्रोडमध्ये बनवलेले घर ट्विटरवरील लोकप्रिय कलाकृतींपैकी एक ठरले आहे. या कलाकृतीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला गेला आहे. कलाकार सुरुवातीला काय करतोय, याची कल्पना येणार नाही. पण ज्यावेळी त्याच्या हातून घरातील सुंदर वस्तूंची कल्पकता दिसू लागते, त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडून ‘अरे वाह’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया बाहेर पडत आहे.

अचंबित करणारे कौशल्य

अक्रोडमधील कलाकृती बनवतानाचे कौशल्य अचंबित करत आहे. या कलाकाराने अक्रोडचे दोन भाग दरवाजाच्या बिजागराने जोडले आहेत. त्यानंतर आतून अक्रोडला छान फिनिशिंग केले आहे. त्यानंतर अक्रोडच्या एका भागात त्याने बुक शेल्फ बनवला असून, यात भरपूर पुस्तके, दिवा, शिडी आणि फोटो आहे.

दुसऱ्या भागात बेडरुम तयार केले आहे. यात बेड, वर-खाली सुंदर पडदे आहेत. तर तिसऱ्या डिझाईनमध्ये आत एक छोटीशी लाईट लागली आहे. यात रिडिंग रुम आणि खोलीची डिझाईन आहे. पुढील डिझाईनमध्ये छोटे प्राणी, टेबल-खुर्ची आदी दिसत आहे.

व्हिडिओला प्रचंड लाईक्स

या व्हिडिओला 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 1 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.