असं भारतीय रेल्वे स्टेशन जेथून चक्क पायी चालत परदेशात जाता येते, पाहा कुठे आहे असं अनोखं स्टेशन

देशात कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रेल्वेचे जाळे विणलेले आहे. देशात विविध वैशिष्ट्ये असलेली रेल्वे स्थानके आहेत. त्यातील काही स्थानके देशाच्या सीमाभागात आहेत.

असं भारतीय रेल्वे स्टेशन जेथून चक्क पायी चालत परदेशात जाता येते, पाहा कुठे आहे असं अनोखं स्टेशन
jogbaniImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 2:05 PM

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात सगळ्यात मोठ्या नेटवर्क पैकी एक आहे. काही रेल्वे स्थानके त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध झाली आहेत. काही रेल्वेस्थानकांचा प्लॅटफॉर्म जगात सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जातो. तर काही स्टेशन दोन राज्यात विभागलेली आहेत. परंतू तुम्हाला माहीती आहे का ? रेल्वेचे शेवटचे स्टेशन कोणते ? तसं रेल्वेने अजून जाहीर केलेले नाही. परंतू काही स्थानकं देशाच्या एका टोकाला आहेत, त्यामुळे परदेशात सहज जाता येते.

देशात कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रेल्वेचे जाळे विणलेले आहे. भारतात एक रेल्वे स्टेशन आहे ज्याच्या पासून चालत परदेशात फिरायला जाता येते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिहारमध्ये एक असे रेल्वे स्थानक आहे, ज्याच्यापासून परदेशात जाता येते. बिहारमध्ये एक असे रेल्वे स्टेशन आहे ज्यातून चालत जरी गेले तरी आपण नेपाळमध्ये पोहचतो. असेच एक रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमध्ये देखील आहे.

येथून चालत फॉरेन ट्रीप

भारतीय रेल्वेचे एक अनोखे स्टेशन बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव जोगबनी आहे. ज्याला देशाचे शेवटचे स्टेशन म्हटल तरी वावगं ठरणार नाही. येथून नेपाळची सीमा काही पावलं आहे. त्यामुळे तुम्ही येथे उतरून पायी फॉरेनला जाऊ शकता. तसेच नेपाळला जाण्यासाठी तुम्हाला व्हीसा किंवा पासपोर्टची गरज लागत नाही. त्यामुळे या स्थानकातून तुमचा विमानाचा खर्चही वाचतो.

अजून एक सीमेवरील स्टेशन

पश्चिम बंगालच्या सिंहाबाद रेल्वे स्थानकाला देशाचे शेवटचं स्टेशन मानलं जातं. दक्षिण भारतात जेथून समुद्र किनारासुरु होतो, तेथील स्थानकालाही देशाचे शेवटचं स्टेशन म्हटलं जातं. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर विभागात असलेले सिंहाबाद स्टेशनमधून एकेकाळी कोलकाता आणि ढाका दरम्यान संपर्क स्थापन केला जात होता.

आज येथे सन्नाटा आहे

या स्थानकांतून एकेकाळी अनेक ट्रेन जात होत्या, परंतू आज सिंहाबाद रेल्वे स्थानक एकदम ओस पडलं आहे. येथे कोणतीही ट्रेन थांबत नाही. या रेल्वे स्थानकाचा वापर केवळ मालगाड्यांच्या वाहतूकीसाठी होतो. सिंहाबाद रेल्वे स्थानक इंग्रजांच्या काळातील आहे.येथे तुम्हाला कार्डबोर्डची तिकीटे पहायला मिळतील. जी आता अन्यत्र वापरात नाहीत. तसेच सिग्नल यंत्रणा, टेलिफोन इतर यंत्रणा इंग्रजाच्या काळातील आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.