आनंद महिंद्रांकडून बैलगाडीचा फोटो शेअर, म्हणाले, “भविष्यात पुन्हा…”
आनंद महिंद्रा यांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते बैलगाडीवर भाष्य करताना दिसत आहेत.
मुंबई : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विशेषत: ट्विटरवरून विविध बाबींवर आपली मतं मांडत असतात. आताही त्यांचं एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बैलगाडीवर (Bullock Cart) भाष्य केलंय. बैलगाडीचा एक फोटो शेअर करत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी “भविष्यात पुन्हा…”, असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरलंय.
व्हायरल व्हीडिओ
आनंद महिंद्रा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विशेषत: ट्विटरवरून विविध बाबींवर आपली मतं मांडत असतात. आताही त्यांचं एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बैलगाडीवर भाष्य केलंय. बैलगाडीचा एक फोटो शेअर करत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी “भविष्यात पुन्हा…”, असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
BACK to the Future… @elonmusk pic.twitter.com/csuzuF6m4t
— anand mahindra (@anandmahindra) April 24, 2022
त्यांच्या या ट्विटला दीड लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तसंच सोळा हजारांहून अधिक लोकांनी त्याला रिट्विट केलं आहे. अनेकांनी कमेंट करत आनंद महिंद्रा यांना जमीनीशी जोडलेला माणूस म्हटलंय. तर काहींनी तुम्ही उत्तम माणूस असल्याचं म्हटलंय.
सध्या एका सायकलवर बसून दोन मुलं प्रवास करतानाचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. एका सायकलवरून दोघांनी प्रवास करणं जरी आपल्यासाठी नवीन नसेल तरी एकाच वेळी दोघांनी सायकल चालवणं हे मात्र विशेष आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अनेकांनी आपल्या अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केलाय. या दोन मुलांनी हा सायकल चालवतानाचा व्हीडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही भावलाय. त्यांनी हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. याला त्यांनी “हा व्हीडिओ सर्वांसाठी प्रेरणणादायी आहे. कुठल्याही मोठ्या युनिव्हासिटीमध्ये असं सहयोग आणि टीमवर्क शिकवलं जात नसेल. टीमवर्कचं महत्व सांगणारा यापेक्षा चांगला व्हिडिओ नसेल!”, असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.
Even Harvard Business School would not have a better video to communicate the virtues of collaboration & teamwork! pic.twitter.com/ALBRYRCFN0
— anand mahindra (@anandmahindra) April 23, 2022
संबंधित बातम्या