आनंद महिंद्रा यांनी दिल्या दिवाळीच्या हटके शुभेच्छा; इस्रोला धन्यवाद देत शेअर केला ‘हा’ व्हिडिओ
इस्रोची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी सर्व भारतीयांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी इस्रोच्या संशोधकांना धन्यवाद दिले आहेत.
भारतातील आघाडीच्या उद्योजकांमध्ये आवर्जून नाव घेतले जाते ते म्हणजे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या तसेच संपूर्ण भारतीयांच्या सतत संपर्कात राहण्याला आनंद महिंद्रा यांचे प्राधान्य असते. रोजच्या जगण्यातील बरीच आदर्श उदाहरणे ते देत असतात. त्या उदाहरणांचा सर्वांच्याच आयुष्यात मोठा फायदा होऊ शकतो या अर्थाने आनंद महिंद्रा यांच्याकडून सोशल मीडियात बऱ्याचदा पोस्ट शेअर केल्या जातात. दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चहातांना शुभेच्छा (Deewali Wishes) देताना त्यांनी इस्रोचा व्हिडिओ शेअर (Share ISRO Video) केला आहे. ही एक प्रकारची इस्रोच्या संशोधकांना दिलेली दाद आहे.
इस्रोची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी सर्व भारतीयांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी इस्रोच्या संशोधकांना धन्यवाद दिले आहेत.
इनोव्हेटिव्ह कंटेंटला नेहमीच प्राधान्य
आघाडीचे उद्योजक आनंद महिंद्रा हे इनोव्हेटिव्ह कंटेंट शेअर करण्याला नेहमीच प्राधान्य देत असतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही त्यांनी अशाच प्रकारे इनोव्हेटिव्ह कंटेंट शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्येच त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Thank you @isro for providing #MondayMotivaton through your pursuit of excellence. These also happen to be the best images—Taking Indian Fireworks to the skies—for wishing everyone a very Happy Diwali! ?????? #HappyDiwali pic.twitter.com/9HcPRPioel
— anand mahindra (@anandmahindra) October 24, 2022
आपल्या एक्सीलेंसच्या माध्यमातून अशाप्रकारे संशोधन केल्याबद्दल तसेच मंडे मोटिवेशन प्रदान केल्याबद्दल धन्यवाद, असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सोबत त्यांनी इस्रोच्या अंतराळयानाचा व्हिडिओ जोडला आहे. आनंद महिंद्रा यांची भावना जाणून घेण्याआधी तुम्ही त्यांनी शेअर केलेला इस्रोचा व्हिडिओ आवर्जून पहा.
आनंद महिंद्रा यांचे मंडे मोटिवेशन
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतीय आतषबाजी अंतराळात नेणारी ही सर्वोत्कृष्ट छायाचित्रे आहेत, असे आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यापासून स्वतःला आवरत नाहीत. व्हिडिओमधील भव्य रॉकेट पाहिल्यानंतर कुणाही भारतीयाचा आनंद गगनात मावेनासा होत आहे.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या एका मिनिटातच लाखो लोकांनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.