Anand Mahindra | आनंद महिंद्रा यांनी शेअर केले लडाख फुटबॉल स्टेडियमचे फोटो, सौंदर्य पाहून लोक…
Anand Mahindra New Tweet | आनंद महिंद्रा यांनी एका स्टेडियमचे फोटो शेअर केले आहेत. ते लोकांना अधिक आवडले आहेत. त्यांनी फुटबॉलच्या मॅच तिथं पाहण्याची इच्छा तिथं व्यक्त केली आहे. फोटो अधिक सुंदर आहेत.
मुंबई : बिझनेसमॅन आनंद महिंद्रा त्यांच्या सोशल मीडियावर Anand Mahindra Shares Ladakh Football Stadium Photos काय सक्रीय असतात. चांगल्या गोष्टी शेअर करीत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील अधिक आहे. ट्विटरच्या ( Anand Mahindra Tweeter post) माध्यमातून अनेक गोष्टी त्यांनी चाहत्यांना सांगितल्या आहे. त्याचबरोबर अनेक गोष्टी लोकांना समजून देखील सांगितल्या आहेत. त्यांच्या अनेक पोस्ट मिलियनमध्ये पाहिल्या गेल्या आहेत. चांगल्या लोकांच्या फायद्याच्या गोष्टी (Football Stadium Photos) त्यांनी वारंवार सोशल मीडियावर मांडून त्यांनी लोकांचं मनोरंजन आणि ज्ञानात भर घातली आहे.
दृष्य तुमचा श्वास थांबवू शकतात
खेलो इंडिया अंतर्गत तयार केलेले खुले सिंथेटिक ट्रॅक आणि अॅस्ट्रोटर्फ असलेले हे फुटबॉल स्टेडियम लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आहे आणि देशातील सर्वात उंच स्टेडियम असल्याचं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे. त्या मैदानात लोकांची बसण्याची क्षमता जवळपास 10 हजार लोकांची आहे. शेअर झालेल्या ट्विटला आनंद्र महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरच्या खात्यावर शेअर केलं आहे. ही दृष्य तुमचा श्वास थांबवू शकतात. परंतु ऑक्सिजन कमी असल्यामुळे तिथं असा कसलाही प्रकार होणार नाही. मी टिव्हीला मॅच बघण्यापेक्षा तिथं जाऊन मॅच पाहणं एकवेळ पसंत करेल असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. व्हायरल झालेले फोटो लोकांना अधिक आवडतील एवढं मात्र निश्चित आहे.
That view takes your breath away. And not because of oxygen depletion!! At some point in the future I want to be physically present at a Football match in that stadium on a Sunday, Instead of being a couch potato and watching cricket on TV! https://t.co/BxJoehTKjW
— anand mahindra (@anandmahindra) April 23, 2023
तीन लाख लोकांनी फोटो पाहिले
आनंद्र महिंद्रा यांनी हे फोटो शेअर केल्यानंतर तीन लाख लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. चार हजार लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. तीनशेपेक्षा अधिक लोकांनी ही पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. नेटकऱ्यांनी त्या फोटो खाली वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘हे श्वास घेणारे दृश्य आहेत. इतक्या सुंदर स्टेडियममध्ये बसून सामना पाहणे हा किती रोमांचकारी अनुभव असेल याची कल्पनाच करता येत नाही.