याला म्हणतात शिस्त..! ‘हे’ चित्र भारतातलंच आहे, Anand Mahindra यांनी Share केला Photo

Traffic Discipline : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मिझोरामचे (Mizoram) असे चित्र ट्विटरवर शेअर (Share) केले आहे, जे पाहून तुम्हीही म्हणाल, की शिस्त काय असते, मिझोरामच्या लोकांकडून शिका. महिंद्रा यांनी मिझोरम वाहतूककोंडीचा एक फोटो रिट्विट केला आहे.

याला म्हणतात शिस्त..! 'हे' चित्र भारतातलंच आहे, Anand Mahindra यांनी Share केला Photo
मिझोराममधील वाहतूक शिस्तीचा व्हायरल फोटोImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 12:17 PM

Traffic Discipline : शहरांमध्ये ट्रॅफिक जॅममध्ये अडकणे हे काही नवे नाही. ट्रॅफिकमधला गोंधळ आणि सततचे हॉर्न याच्यामध्ये सगळ्यांचीच जणू बाहेर पडण्यासाठी अक्षरश: शर्यत लागलेली असते. यादरम्यान कोणी सिग्नल तोडून निघून जातो तर काही जण विरुद्ध दिशेने जाण्यासही घाबरत नाहीत. मग वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर दादागिरी सुरू होते. तुम्ही काही लोकांना असेही म्हणताना ऐकले असेल, की तुम्हाला माहीत नाही, माझे वडील कोण आहेत? पण महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मिझोरामचे (Mizoram) असे चित्र ट्विटरवर शेअर (Share) केले आहे, जे पाहून तुम्हीही म्हणाल, की शिस्त काय असते, मिझोरामच्या लोकांकडून शिका. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मिझोरम वाहतूककोंडीचा एक फोटो रिट्विट केला आहे. यात त्यांनी लिहिले, की किती अप्रतिम चित्र आहे. एकही वाहन रोड मार्करच्या बाहेर नाही. हे प्रेरणादायी आहे. यासोबतच एक मजबूत संदेशही देत ​​आहे. आता आपल्या जीवनाचा दर्जा कसा सुधारायचा, हे आपल्यावर अवलंबून आहे. नियम पाळा.

कौतुकास्पद मिझोराम

मिझोरामचे लोक खरोखरच कौतुकास्पद आहेत. फोटोत तुम्ही पाहू शकता, की वाहतूककोंडीत अडकले असूनही, लोक शांतपणे त्यांच्या रांगेत उभे आहेत आणि ट्रॅफिक मोकळे होण्याची वाट पाहत आहेत. जेव्हा अर्धा रस्ता पूर्णपणे रिकामा असतो. त्याचबरोबर रस्त्यावर दुभाजकही नाही. त्यानंतरही लोक रस्त्यावर मार्कर ओलांडत नाहीत.

संदीप अहलावत यांनी ट्विट केला फोटो

हा फोटो सर्वप्रथम संदीप अहलावत नावाच्या यूझरने पोस्ट केला होता, जो उद्योगपती महिंद्राने रिट्विट केला आहे. संदीप अहलावत यांनी पोस्टसोबत लिहिले, की मी फक्त मिझोराममध्ये अशी शिस्त पाहिली आहे. फॅन्सी गाड्या नाहीत, उद्धटपणा नाही, रस्त्यावरचा राग नाही, विनाकारण हॉर्न वाजवणारे नाहीत आणि ट्रॅफिकधून सुटण्यासाठी विनाकारण चढाओढ नाही… सगळीकडे शांतता.

वाहतुकीचे नियम पाळा

वाहतूक नियमांच्या अज्ञानामुळे भारतात दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होतो. सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये द्रुतगती महामार्गासह राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात 47,984 जणांना आपला जीव गमवावा लागला.

आणखी वाचा :

‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती…’ महिला खेळाडूचा ‘हा’ Viral video देतोय संदेश

Cat cute video : पाण्यात पडलेल्या मांजरीला वाचवलं; पाहा, काय Jugaad केलं?

Inspirational video viral : ‘या’ तरुणानं ठरवलंय, सैन्यात भरती व्हायचं आणि देशासाठी काहीतरी करायचं!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.