Radhika & Anant Ambani : राधिका आणि अनंत अंबानी यांना मिळाला मोठा बहुमान; जगाने घेतली दखल

न्यूयॉर्क टाइम्सने 2024 च्या सर्वात स्टायलिश लोकांच्या यादीत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा समावेश केला आहे. त्यांच्या शाही लग्नाने जगभर चर्चा निर्माण केली. या यादीत बेयॉन्से, जेंडाया यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचाही समावेश आहे. राधिका आणि अनंत यांच्या लग्नाचा आणि प्री-वेडिंग फंक्शन्सचा उल्लेख यादीत करण्यात आला आहे. हे जोडपे त्यांच्या स्टायलिश लूकसाठी ओळखले जाते.

Radhika & Anant Ambani : राधिका आणि अनंत अंबानी यांना मिळाला मोठा बहुमान; जगाने घेतली दखल
anant ambani-Radhika Merchant
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:41 PM

काही दिवसानंतर जुन्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. डिसेंबर महिना येताच लोक नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज होतात. त्यासाठी अनेक वेगवेगळे इव्हेंट आखले जातात. पार्ट्या होतात. दोस्त मित्र भेटतात. जुन्या वर्षात जे महत्त्वाचे इव्हेंट्स झाले, ज्या घटना घडल्या त्याची लिस्टही जारी केली जाते. द न्यूयॉर्क टाइम्सने 2024ची एक यादी जाहीर केली आहे. सर्वात स्टायलिश व्यक्तींची ही लिस्त आहे. त्यात भारतातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश झाला आहे. गंमत म्हणजे या दोन्ही व्यक्ती काही बॉलिवूड स्टार नाहीयेत.

यंदा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न झालं. न्यूयॉर्क टाइम्सने जारी केलेल्या या यादीत अनंत आणि राधिका यांचा समावेश झाला आहे. लग्नामुळे हे जोडपं अधिक चर्चेत आलं होतं. लग्न आणि त्याआधी झालेल्या प्रीवेडिंग इव्हेंटनंतरही राधिका आणि अनंत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची लोकप्रियता मिळाली.

कॅप्शन काय?

मोस्ट स्टायलिश 2024च्या यादीत राधिका आणि अनंत अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे. एक रेड कार्पेट, पॉप्सिकल्सच्या आकाराचं इमेरेल्ड (पन्ना रत्न) पासून रिहानापर्यंत त्याच्या प्रीवेडिंग आणि लग्नाच्या उत्सवाबाबतचं सर्व काही सामिल होतं, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. या कॅप्शनसोबत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमधला हा फोटो आहे. या फोटोत राधिका पेस्टल शेडचा हेवी वर्क असलेला लहेंग्यात आहे. तर अनंत यांनी राधिकाला मॅच करणारी शेरवानी घातली आहे.

यांचाही समावेश

राधिका आणि अनंत यांच्या व्यतिरिक्त न्यूयॉर्क टाइम्सच्या लिस्टमध्ये बेयॉन्से, जेंडाया, एडेल, चार्ली एक्ससीएक्स, निकोला कफलान, कोलमॅन डोमिंगो, डॅनियल क्रेग, डेमी मूर, दक्षिण कोरियन शार्पशूटर किम येजी, हसन मिन्हाज, चॅपल रोन, सिंथिया एरिवो, एरियाना ग्रांडे आदी प्रसिद्ध लोकांची नावे आहेत.

खास वर्ष

अंबानी कुटुंबासाठी हे वर्ष अत्यंत संस्मरणीय ठरलं. याच वर्षाच्या जुलै महिन्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचं लग्न झालं. राधिका मर्चंट हिच्याशी त्यांचा विवाह पार पडला. भारतातील हा सर्वात महागडा विवाह होता. या शाही विवाह सोहळ्याला जगभरातील नामवंत उपस्थित होते. राधिका या वीरेन मर्चंट यांच्या कन्या आहेत. वीरेन मर्चंट हे एन्कोअर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन आहेत. राधिका या एक प्रशिक्षित भारतीय नृत्याांगणा आहेत. त्यांनी भरतनाट्यम केलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.