मुंबई, दिवसभरात जर तुम्ही कोणत्याच संघर्षाला सामोरं जात नसाल तर तुम्ही खरंच योग्य दिशेला जात आहात का हे नक्की तपासा असे स्वामी विवेकानंदांनी (Swami Vevekanand) म्हंटले आहेत. संघर्ष(Challenge in Life) हा आयुष्याची दुसरी बाजू आहे. काहीजण त्याला थकतात, काही निराश होऊन आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं देखील उचलतात, पण मुंबईच्या लोकलमधले हे दृश्य आयुष्यात सकारात्मकता किती महत्त्वाची आहे हे दाखवून देते. इंटरनेटवर वेळोवेळी असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मुंबई लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकणाऱ्या एका वृद्ध महिलेची अशीच एक क्लिप व्हायरल झाली आहे.
किसी की ज़िंदगी आराम है, संघर्ष किसी की ज़िंदगी का नाम है। ये महिला और इनके जैसे हज़ारों लोग जो मेहनत कर दो वक्त की रोटी कमाते हैं, हो सके तो उनसे सामान ज़रूर खरीदें। pic.twitter.com/zKXU3oIE8w
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “या महिला आणि तिच्यासारखे हजारो लोकं कठोर परिश्रम करून दोन वेळची भाकरी कमावतात. शक्य असल्यास त्यांच्याकडून वस्तू खरेदी करा.”
हा व्हिडिओ आत्तापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. लोकं महिलेच्या संघर्षाचे कौतुक करीत आहेत. अनेकांनी मदतीचा हात पुढे करण्यासाठी तिचा पत्ता देखील विचारला आहे. तर अनेक जण तिच्या या जिद्दीला सलाम करीत आहेत. आयुष्यात संघर्षाला घाबरून झुकणं फारच सोपं असतं मात्र त्याच्याशी लढणारे कायमच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.