घडाळ्यात ही वेळ दिसताच लगेच मागा विश; मागितलेली इच्छा होते पूर्ण
घडाळ्यातील ही वेळ म्हणजेच भाग्याचीच वेळ असते असे मानलं जातं. अंकशास्त्रानुसार, ही वेळ म्हणजे इच्छा पूर्ण करणारी असते असं मानलं जातं. तसेच ही वेळ सतत दिसत असेल तर विश्व आपल्याला काहीतरी संकेत देत असून यावेळी मागितलेली इच्छा ही पूर्ण होतेच अस म्हटलं जातं.
अनेकांना अंकशास्त्राबद्दल फार आकर्षण असतं. अंकांमागेही काही रहस्य आणि अर्थ दडलेले असतात अस म्हटलं जातं. त्यात अशी काही वेळ असते जी पाहणं आणि त्यात ती अचानक पाहणं लकी मानलं जातं. ज्या वेळेला एन्जल नंबरही म्हणतात. असं म्हणतात की एन्जल नंबरची वेळ दिसल्यावर लगेच एखादी विश मागावी ती पूर्ण होते.
घडाळ्यात दिसणारी ही वेळ असते लकी
अनेकदा आपलं लक्ष भिंतीवरील घड्याळात, हातावरील घडाळ्यात किंवा कधी मोबाईलकडे तर कधी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या स्क्रीनकडे आपले सहज लक्ष जातं किंवा वेळ पाहण्यासाठी अचानक लक्ष जातं. जर त्यावेळी एन्जल नंबरची वेळ दिसली तर ते लकी असतं असं म्हणतात. ती वेळ आणि ते नंबर कोणते ते पाहुयात.
अंकशास्त्रानुसार 11 किंवा 11:11 ही वेळ, नंबर दिसणं लकी समजलं जातं. या नंबरला एन्जल नंबरही म्हणतात. अंकशास्त्रानुसार हा अंक संयम, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि आध्यात्मिक समज यांचे प्रतीक मानला जातो.
या वेळेला मागितलेली इच्छा होते पूर्ण?
एकाच ठिकाणी 11 क्रमांक दोनदा पाहणे म्हणजे 11:11 अशापद्धतीची वेळ पाहणे लकी समजले जाते. तसेच हा नंबर दिसल्यास देवाचे, युनिव्हर्सचे आभार मानून एखादी इच्छा मनातून मागितली तर ती पूर्ण होण्यास मदत होते असं म्हटलं जातं.
आपणास अनेक दिवस सतत घड्याळात 11:11 दिसत असतील तर हा निव्वळ योगायोग समजू नये असही म्हटलं जातं. अंकशास्त्रानुसार, 11:11 वाजलेले पाहणे विशेष समजले जाते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा क्षण खूप खास असतं तसेत हा नंबर तुम्हाला काहीतरी संकेत देत असतो असही मानलं जातं.
11:11 हा आकडा किंवा ही वेळ पाहण्याचा अर्थ काय?
11:11 पाहण्याशी संबंधित अनेक विश्वास आणि समजुती आपल्या आजूबाजूला आहेत. जेव्हाही तुम्ही हा आकडा पाहता तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्याची नवी वाट उघडणार आहे. अशा स्थितीत देवाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करावी. यावेळी केलेली प्रार्थना देव कधीच नाकारत नाही, असे मानले जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवणे किंवा नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
सर्वसाधारण समजुतीनुसार, जेव्हाही तुम्ही घड्याळात हा क्रमांक पाहाल, त्याच वेळी तुम्ही तुमची कोणतीही इच्छा विचारलेली असते असं म्हटलं जातं. असे म्हणतात की 11:11 वाजता डोळे बंद करून विचारलेली कोणतीही इच्छा नक्कीच पूर्ण होते.
घड्याळात ही वेळ दिसल्यास तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल तर हा क्षण तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच स्वतःमध्ये पहा आणि विश्वाची अदृश्य शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे जग बदलू शकणारे संकेत कदाचित जाणवतील.
11 :11 ला इच्छा का मागितली जाते?
11:11 ची इच्छा लवकर मेनिफेस्ट होते अशी धारणा आहे. या अंकासोबत psychic vibrations असतात. त्यामुळे लोकांना psychic awareness देण्यासाठी हा अंक वापरला जातो. त्याचे मानसशास्त्राचे निगडीतही सकारात्मक परिणाम आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवरून दिलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)