त्याने चक्क किंग कोब्राला हवेत भिरकावले; मग जे झाले ते पाहून ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल !
व्हायरल व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये अशाच प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. इंस्टाग्रामवर 'द रियल टारझन' नावाच्या आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये किंग कोब्रा हा जंगलचा राजा मानला जातो. जसे सिंहापुढे इतर प्राणी उभे राहायलाही ‘वाह रे पट्ट्या’ धजावत नाहीत, तशीच भीतीयुक्त स्थिती किंग कोब्राच्या बाबतीत असते. सापाच्या प्रजातींमध्ये किंग कोब्रा हा अत्यंत धोकादायक सरपटणारा साप मानला जातो. सर्पमित्रांचीही या किंग कोब्रापुढे अनेकदा भीतीने गाळण उडते. सध्या मात्र सोशल मीडियात व्हायरल झालेल्या सर्व मित्राने सर्वांना अवाक् केले आहे. त्याने किंग कोब्राला केवळ हात लावला नाही तर त्याला हवेत भिरकावले देखील. त्याचीही धमक पाहून सोशल मीडियात त्याला मोठ्या प्रमाणावर ‘वाह रे पट्ट्या’ अशी वाहवा दिली जात आहे.
किंग कोब्राचा रौद्र अवतार पाहून ‘तो’ हादरला
विशाल किंग कोब्राला हात लावणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यातच हात घालणे. व्हायरल व्हिडिओतील तरुणाने अर्थात सर्पमित्राने किंग कोब्राला सुरुवातीला प्रेमाने हात लावला. त्यानंतर त्याने कोब्राला हवेत भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोब्रा भलताच खवळला आणि त्याने मागे वळून सर्पमित्राला पणा दाखवला.
View this post on Instagram
सर्पमित्र काही क्षण दचकलाच. मात्र त्याने किंग कोब्राशी खेळण्याचा प्रयत्न सोडला नाही. लोक व्हिडिओमधील थरारक अनुभव घेतानाच सर्पमित्राचे भरभरून कौतुकही करत आहेत. सापाच्या कुठल्याही प्रजातीशी एवढी जवळीक साधणे साधी गोष्ट नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून बाहेर पडली आहे.
व्हिडिओला पावणे पाच लाख लाईक्स
व्हायरल व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये अशाच प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. इंस्टाग्रामवर ‘द रियल टारझन’ नावाच्या आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल पावणे पाच लाख लोकांनी लाईक दिले आहे.
सोशल मीडियामध्ये सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र किंग कोब्राशी अशा प्रकारचा धाडसी संघर्ष करण्याचा व्हिडिओ दुर्मिळ आहे. त्यामुळेच लोक सर्पमित्र तरुणाच्या धाडसाचे कौतुक करत आहे.
स्वतः थरारक अनुभव घेतल्यानंतर हा व्हिडिओ इतर मित्र मंडळीपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक सोशल मीडिया युजर्स करत आहेत. यावरून तरुणाच्या धाडसाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात येत आहे.
कुठल्याही सापासमोर घाबरून जाण्याची गरज नसते. मात्र तितकीच पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन सर्पमित्र करीत आहेत.