किशोर कुमार यांच्या बंगल्यामध्ये सुरू होणार विराट-अनुष्काचे रेस्टॉरंट; 5 वर्षाचा झाला करार; चाहत्यांना उत्सुकता
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांकडून खवय्यांसाठी मोठी गोष्ट घेऊन येत आहेत. विराटने हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता-गायक किशोर कुमार (Actor singer Kishor kumar) यांच्या मालकीचा असलेला गौरी कुंज बंगला आपल्या रेस्टॉरंटसाठी भाडोत्री घेतला आहे. आणि थोड्याच दिवसात तो त्या रेस्टॉरंटचे उद्घाटनही करणार आहे.
मुंबईः भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांकडून खवय्यांसाठी मोठी गोष्ट घेऊन येत आहेत. विराटने हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता-गायक किशोर कुमार (Actor singer Kishor kumar) यांच्या मालकीचा असलेला गौरी कुंज बंगला आपल्या रेस्टॉरंटसाठी भाडोत्री घेतला आहे. आणि थोड्याच दिवसात तो त्या रेस्टॉरंटचे उद्घाटनही करणार आहे. विराट कोहलीने किशोर कुमार यांचा जो बंगला भाडोत्री घेतला आहे तो मुंबईतील जुहूमध्ये आहे. गौरी कुंज हा बंगला विराट कोहली आपल्या बहुचर्चित असलेली रेस्टॉरंट चेन ‘One8 Commune’साठी वापरणार आहे. विराट आणि अनुष्काच्या या रेस्टॉरंटच्या बातमीमुळे या दोघांच्याही चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
विराट आणि अनुष्काच्या या रेस्टॉरंटच्या बातमीमुळे चाहत्यांना तर उत्सुकता आहेच मात्र विराटच्या या रेस्टॉरंटच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
जर्सी क्रमांक ’18’
भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या विराटने आपल्या एक रेस्टॉरंटचे नाव ‘One8 Commune’ ठेवले आहे. हे नाव ठेवण्यापाठीमागे त्याचा क्रिकेट जगतातील त्याच्या जर्सी क्रमांक ’18’ वरून हे नाव ठेवले आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून आपल्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटनाबाबतही ही माहिती दिली आहे.
रेस्टॉरंटची साखळी
विराट कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जुहू, मुंबई येथे येत आहे. विराट कोहलीच्या ‘वन8 कम्युन’ या रेस्टॉरंटची साखळी कोलकाता, पुणे आणि क्रिकेटच्या होम टाऊन दिल्लीमध्ये सुद्धा आहे.
बीएमसीची नोटीस
किशोर कुमार यांच्या जुहू येथील ‘गौरी कुंज’ या बंगल्यामध्ये पूर्वी ‘बी मुंबई’ नावाचे एक रेस्टॉरंट होते. ते काही कारणामुळे बंद झाले आहे. किशोर कुमार यांच्या याच बंगल्याला काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम नियमांविरुद्ध काम केल्याच्या कारणांवरुन नोटीस देण्यात आले होते अशीही माहिती आहे.
रेस्टॉरंटची उत्सुकता…
महानगरपालिकेच्या नोटीसमुळे रेस्टॉरंट मालकानेही बंगल्याचा काही भाग तोडून तो दुरुस्त केला होता. तर आता विराट कोहलीने पाच वर्षांसाठी घेतला असून त्यामध्ये विराट आणि अनुष्काचे रेस्टॉरंट आता कधीही उघडण्यास तयार आहे.