Video | ओये गुरुsss.. जुना व्हिडीओ पुन्हा Viral भिडू! भगवंत मान यांच्या जोकवर जेव्हा सिद्धू खळखळून हसले

Bhagwant Mann : लाफ्टर चॅलेंजमध्ये आलेल्या भगवंत मान यांनी सरकार आणि राजकारण यावर विनोद सांगितला होता. त्यावर तेव्हा या कार्यक्रमात परीक्षक या भूमिकेत असलेल्या शेखर सुमन आणि नवज्योतसिंह सिद्धू यांनी भरभरुन दाद दिली होती.

Video | ओये गुरुsss.. जुना व्हिडीओ पुन्हा Viral भिडू! भगवंत मान यांच्या जोकवर जेव्हा सिद्धू खळखळून हसले
भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेतImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 12:33 AM

मुंबई : पंजाबचे होणारे नवे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) निवडून आल्यापासून चर्चेत आहेत. कॉमेडियन ते राजकारणी आणि आता पंजाबचे संभाव्य मुख्यमंत्री असा हा प्रवास चर्चेत आला आहे. पंजाबच्या धुरी (Dhuri, Punjab) मतदारसंघातून भगवंत मान विधानसभेची निवडणूक जिंकले. आपनं आपला मुख्ममंत्री पदाचा चेहरा कोण असेल, हे आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार आता भगवंत मान हे लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्याआधी सध्या भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल (Viral Video) पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या विनोदांवर त्यांनी अनेकदा प्रेक्षकांना हसवलं आहे. मात्र आता नव्यानं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भगवंत मान हे राजकारण आणि सरकार यांवर उपहासात्मक टोले लगावताना दिसले आहेत. त्यांच्या या टोलेबाजीवर नवज्योत सिंह सिद्धू हे देखील खळखळून हसलेत.

लाफ्टर चॅलेंजमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या भगवंत मान यांना राजकारणात टक्कर द्यावी लागेल, असं तेव्हा नवज्योतसिंह सिद्धू यांनाही वाटलं नसेल. आता तर नवज्योत सिंह सिद्धूच नव्हे तर चरणजीतसिंह चन्नी, कॅप्टर अमरिंदर सिंह, सुखबिरसिंह बादल यांसारख्यांना मात देत भगवंत मान यांच्या गळ्यात आपच्या पंजाबमधील सरकारचं नेतृत्त्व करण्याची माळ पडणार मडणार आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ ?

लाफ्टर चॅलेंजमध्ये आलेल्या भगवंत मान यांनी सरकार आणि राजकारण यावर विनोद सांगितला होता. त्यावर तेव्हा या कार्यक्रमात परीक्षक या भूमिकेत असलेल्या शेखर सुमन आणि नवज्योतसिंह सिद्धू यांनी भरभरुन दाद दिली होती. राज्य कसं करायचंय, याची नीती बनवत राहणं, हे राजकारण असतं तर एक मिनिटांचं लक्ष देऊन विसरुन जाणं, सरकार (गव्हर्नमेन्ट) असतं असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला होता.

पाहा व्हिडीओ :

लाफ्टर चॅलेंजच्या वेळी घडलेला हा किस्सा आता नव्यानं चर्चेत आला आहे. आपनं पंजाबमध्ये मुसंडी मारत दमदार कामगिरी करुन दाखवली. 117 पैकी 92 जागा जिंकत आपनं पंजाबमध्ये सगळ्यांना पराभवाचं पाणी पाजलंय. दिल्लीनंतर आता आपचं पंजाबमध्ये सरकार स्थापन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भगवंत मान यांचा विनोदवीर ते मुख्यमंत्री असा झालेला हा प्रवास देशभर चर्चेचा विषय ठरतोय.

संबंधित बातम्या :

‘पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्ममंत्र्यांचा नाही, तर फक्त भगतसिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो’

Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं ‘पंजाब हॉस्पिटल’ करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!

Punjab Election results 2022 : शरद पवारांच्या घरी काम करणाऱ्यांची मतं “आप”ला, असं का घडलं?

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.