मुंबई : पंजाबचे होणारे नवे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) निवडून आल्यापासून चर्चेत आहेत. कॉमेडियन ते राजकारणी आणि आता पंजाबचे संभाव्य मुख्यमंत्री असा हा प्रवास चर्चेत आला आहे. पंजाबच्या धुरी (Dhuri, Punjab) मतदारसंघातून भगवंत मान विधानसभेची निवडणूक जिंकले. आपनं आपला मुख्ममंत्री पदाचा चेहरा कोण असेल, हे आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार आता भगवंत मान हे लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्याआधी सध्या भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल (Viral Video) पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या विनोदांवर त्यांनी अनेकदा प्रेक्षकांना हसवलं आहे. मात्र आता नव्यानं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भगवंत मान हे राजकारण आणि सरकार यांवर उपहासात्मक टोले लगावताना दिसले आहेत. त्यांच्या या टोलेबाजीवर नवज्योत सिंह सिद्धू हे देखील खळखळून हसलेत.
लाफ्टर चॅलेंजमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या भगवंत मान यांना राजकारणात टक्कर द्यावी लागेल, असं तेव्हा नवज्योतसिंह सिद्धू यांनाही वाटलं नसेल. आता तर नवज्योत सिंह सिद्धूच नव्हे तर चरणजीतसिंह चन्नी, कॅप्टर अमरिंदर सिंह, सुखबिरसिंह बादल यांसारख्यांना मात देत भगवंत मान यांच्या गळ्यात आपच्या पंजाबमधील सरकारचं नेतृत्त्व करण्याची माळ पडणार मडणार आहे.
लाफ्टर चॅलेंजमध्ये आलेल्या भगवंत मान यांनी सरकार आणि राजकारण यावर विनोद सांगितला होता. त्यावर तेव्हा या कार्यक्रमात परीक्षक या भूमिकेत असलेल्या शेखर सुमन आणि नवज्योतसिंह सिद्धू यांनी भरभरुन दाद दिली होती. राज्य कसं करायचंय, याची नीती बनवत राहणं, हे राजकारण असतं तर एक मिनिटांचं लक्ष देऊन विसरुन जाणं, सरकार (गव्हर्नमेन्ट) असतं असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला होता.
PUNJAB
It’s pretty clear that @BhagwantMann
will be the next CMAmong his competitors was @sherryontopp#Throwback to the Laughter Challenge – where Bhagwant was cracking a joke on politics and Siddhu was laughing as the judge. #PunjabElections
pic.twitter.com/gcoCnRa91R— Raj (@iamup) March 10, 2022
लाफ्टर चॅलेंजच्या वेळी घडलेला हा किस्सा आता नव्यानं चर्चेत आला आहे. आपनं पंजाबमध्ये मुसंडी मारत दमदार कामगिरी करुन दाखवली. 117 पैकी 92 जागा जिंकत आपनं पंजाबमध्ये सगळ्यांना पराभवाचं पाणी पाजलंय. दिल्लीनंतर आता आपचं पंजाबमध्ये सरकार स्थापन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भगवंत मान यांचा विनोदवीर ते मुख्यमंत्री असा झालेला हा प्रवास देशभर चर्चेचा विषय ठरतोय.
‘पंजाबच्या सरकारी कार्यालयात मुख्ममंत्र्यांचा नाही, तर फक्त भगतसिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो’
Punjab Election results 2022 : शरद पवारांच्या घरी काम करणाऱ्यांची मतं “आप”ला, असं का घडलं?