नक्षलवादी भागात जेव्हा जवान नृत्य करतात, पाहा व्हिडीओ, अभिमान वाटेल!

| Updated on: Feb 03, 2021 | 8:07 PM

छत्तीसगडच्या बस्तर भागात तैनात असलेल्या जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे (Army personal doing Chhattisgarh traditional dance in Naxalite area)

नक्षलवादी भागात जेव्हा जवान नृत्य करतात, पाहा व्हिडीओ, अभिमान वाटेल!
Follow us on

बस्तर (छत्तीसगड) : देशाचे सैनिक स्वत:चं घरदार सोडून शेकडो-हजारो किलोमीटर लांब देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. ते रात्रं-दिवस डोळ्यात तेल घालून आपल्या सुरक्षेची काळजी घेतात. कधी ते सीमेवर उणे तापमानात तर कधी नक्षलग्रस्त भागात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी झटत असतात. असे हे वीर जवान ज्या भागात तैनात आहेत त्या भागातील संस्कृतीशी एकरुप होताना बघितलं तर आपालाही उर भरुन येईल. तसाच काहीसा प्रकार छत्तीसगडच्या बस्तर या नक्षलग्रस्त भागात बघायला मिळाला आहे (Army personal doing Chhattisgarh traditional dance in Naxalite area).

बस्तर भागात तैनात असलेल्या जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जवान छत्तीसगडचं पारंपरिक नृत्य करताना दिसत आहेत. जवान अत्यंत शिस्तबंद, मजेत आणि मनसोक्तपणे नृत्य करताना दिसत आहेत. घरादारापासून एवढ्या लांब राहून सहकार्यांसोबत इतक्या गुण्यागोविंदाने नृत्य करताना बघून तुम्हालाही आपल्या जवानांचा अभिमान वाटेल.

या व्हिडीओला पोलीस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “छत्तीगडच्या बस्तर भागात नक्षली कारवायांना नियंत्रणात आणणारे जवान छत्तीसगडचं पारंपरिक नृत्य करत आहेत. या जवानांमुळेच नक्षलवादी पहिल्यापेक्षा जास्त शांत आहेत. लोक आता प्रगतीच्या मार्गाने पुढे जात आहेत. डान्सला एन्जॉय करा. जय हिंद”, असं दिपांशू कांब्रा यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगात व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे. याशिवाय जवानांचं नृत्य बघून अनकेजण त्यांचे फॅन झाले आहेत (Army personal doing Chhattisgarh traditional dance in Naxalite area).

हेही वाचा : श्रीलंकेत भारताला मोठा झटका; चीनसाठी आनंदाची खबर