अंबरनाथमध्ये मेडिकल हबची उभारणी होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मंजुरी

अंबरनाथ येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास देशमुख यांनी हिरवा कंदील दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करून प्रस्ताव तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देशही दिले आहेत.

अंबरनाथमध्ये मेडिकल हबची उभारणी होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मंजुरी
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 7:45 PM

कल्याण : अंबरनाथ पूर्व मधील तब्बल २६ एकर शासकीय जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न केला आहे. बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंबरनाथ येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास देशमुख यांनी हिरवा कंदील दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करून प्रस्ताव तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देशही दिले आहेत.(Medical Education Minister Amit Deshmukh approves medical college in Ambernath)

राज्य सरकारने जनतेच्या आरोग्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे ठाणे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले नाही. सद्याच्या परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि लगतच्या भागातील सामान्य जनतेला तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकेल असे सुसज्ज रुग्णालय नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती मध्ये मुंबई येथील के.ई.एम. अथवा जे. जे. रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे या भागातील सर्व सामान्य नागरिकांची आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी हा प्रस्ताव तयार करून तो मार्गी लावला आहे.

आ. डॉ. बालाजी किणीकर यांचा पाठपुरावा

सध्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विधार्थ्याना प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंबरनाथ येथील सर्वे नं.१६६ येथील शासकीय जागेवर ठाणे जिल्ह्याकरिता “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय” उभारण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्य मिळू शकेल, असा विश्वास यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सह संचालक डॉ. चंदनवाले, नगरविकास विभागाचे सहसचिव संजय बानाईत, उपसचिव कैलाश बधान, उल्हासनगर प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

प्रकल्पाची पळवापळवी नाहीच; देशमुखांनी विनायक राऊतांचे आरोप फेटाळले

Medical Education Minister Amit Deshmukh approves medical college in Ambernath

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.