एकाच घड्याळात सर्वाधिक हीरे जडवले, चमचमत्या तब्बल 17524 हिऱ्यांचा दागिना गिनिज बुकात
रेनानी ज्वेलर्सचे सीईओ आणि संस्थापक हर्शित बंसल यांच्या ज्वेलरीने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.
दिल्ली :ज्वेलरी डीझायनिंगच्या क्षेत्रात भारताने नवा विक्रम केला आहे. महिलांना असलेल्या दागिन्यांच्या वेडामुळे आपल्या देशात सर्वाधिक ज्वेलरी तयार होत असते. आता तर पुरूषही ज्वेलरी घालत असतात. अशात देशातील एका सराफाने तब्बल 17,524 हिरे जडलेले मनगटी घड्याळ तयार करीत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या ज्वेलरीची दखल घेतली आहे. या हिऱ्यांना आंतरराष्ट्रीय जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट लॅब (IGI) सर्टीफीकेट्स देऊन हे हीरे प्रमाणित केले.
रेनानी ज्वेलर्सचे सीईओ आणि संस्थापक हर्शित बंसल यांच्या ज्वेलरीने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. त्यांनी तयार केलेल्या रिस्ट वॉचने या विश्वविक्रम केला आहे. सर्वाधिक हीरे एकाच मनगटी घड्याळात सेट केल्याबद्दल हा नवा विश्वविक्रम झाला आहे. सर्वात जास्त तब्बल हिरे 17,524 एकाच रिस्ट वॉचमध्ये जडवल्याबद्दल मेरठमधील एका ज्वेलरची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
आम्ही सुरुवातीला अनेक नविन आकर्षक डिझाईन्सवर अभ्यास केला होता. परंतू आमच्या मनात एक गोष्ट निश्चित होती की दागिना असा बनवायचा की तो परीधान करताना कोणतीही गैरसोय नको. महिलांसाठी 100 टक्के घालण्यायोग्य असा अमुल्य आणि मोहक असा दागिना तयार झाल्याचे मेरठचे ज्वेलर हर्शित बंसल यांनी सांगितले.
आम्ही सुरुवातीला अनेक सुंदर मनमोहक डिझाईन्सचा अभ्यास केला. परंतू आमच्या धैय्य निश्चित होते. असा दागिना घडवायचा की जो महिलांना शंभर टक्के घालण्यायोग्य असायला हवा. त्यातून हा चमचमता सर्वोत्कृष्ट कलाकुसरीचा मोहक नमूना तयार झाल्याचे मेरठचे ज्वेलर हर्शित बंसल यांनी सांगितले
हाँगकाँगच्या ज्वेलरीचा विक्रम तोडला
यापूर्वी हाँगकाँगच्या एरॉन शुम ज्वेलरी लिमिटेडने डिसेंबर 2018 मध्ये 15,858 हिरे जडलेले रिस्ट वॉच बनवून विश्वविक्रम केला होता. तो विक्रम बंसल यांनी तोडला आहे. “हे सुंदर घड्याळ बनवण्यासाठी जवळपास 11 महिने लागले, या रिस्ट वॉचच्या डीझाइनची सुरुवात हाताने स्केच काढून केली, हा प्रवास अतिशय सुंदर होता असे ” बन्सल म्हणाले.
घड्याळाची किंमत गुलदस्त्यात
या हिऱ्यांना आंतरराष्ट्रीय जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट लॅब (IGI) सर्टीफीकेट्स देऊन हे हीरे प्रमाणित केले. याच 17,512 पांढरे हिरे आणि 12 काळे हिरे आहेत. या घड्याळाचे वजन 373.030 ग्रॅम आहे आणि त्यात 54.70 कॅरेट नैसर्गिकरित्या हाताने कटींग केलेले हिरे आहेत. समान रंग, आकार, आणि क्लीअरीटी असलेल्या हिऱ्यांची खरेदी करणे हे मोठे आव्हानात्मक काम होत असे बन्सल यांनी सांगितले.
याआधीही विश्वविक्रम केला होता
2020 मध्येही हर्शित बन्सल यांनी एकाच अंगठीत सर्वाधिक हिरे जडवण्याचा विश्वविक्रम केला होता. या अंगठीमध्ये 12,638 नैसर्गिक हिरे जडवले होते. रेनानी ज्वेल्सने झेंडूच्या फुलांच्या आकारातील MARIGOLD – The ring of prosperity’ नावाच्या अंगठीसाठी हा रेकॉर्ड झाला होता. मे 2022 मध्ये केरळमधील एका ज्वेलर्सने हा विक्रम मोडला.