Meta ने पाठवताच अलर्ट, चमत्कार झाला, 12 मिनिटात 9 किमीचे अंतर कापत पोलिसांनी तरुणाचा जीव वाचवला

Meta Timely Alert : मेटा अलर्टमुळे एका तरुणाचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा तरुणाने इन्स्टाग्राम लाईव्ह करत झोपेच्या गाळ्या खाल्ल्या आणि आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. तर मेटाने लागलीच व्हिडिओ आणि लोकेशन पाठवल्याने पुढील अनर्थ टळला.

Meta ने पाठवताच अलर्ट, चमत्कार झाला, 12 मिनिटात 9 किमीचे अंतर कापत पोलिसांनी तरुणाचा जीव वाचवला
मेटा टाईमली अलर्ट
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 10:32 AM

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील 24 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. या तरुणाने इन्स्टाग्राम लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने लाईव्ह करत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म मेटाने लागलीच उत्तर प्रदेश पोलिसांना अलर्ट पाठवला. लोकेशन आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केला. अवघ्या 12 मिनिटात पोलिसांनी 9 किमीचे अंतर कापत या तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मेटाने वाचवला प्राण

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा तरुणा शाहजहांपूर जवळील भूडिया गावातील रहिवाशी आहे. या 24 वर्षीय तरुणाने गुरूवारी रात्री इन्स्टाग्रामवर लाईव्ह केले. त्याचवेळी त्याने झोपेच्या गोळ्या खाल्या. या व्हिडिओविषयी मेटाच्या सोशल मीडिया सेंटरने अलर्ट दिला. तेव्हा पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. मेटाने पोलिासंनी व्हिडिओ आणि लोकेशन अलर्ट रात्री 11:05 वाजता पाठवला. पोलिस मुख्यालयातून शाहजहांपूर पोलिसांना याची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी नऊ किलोमीटरचे अंतर झपाट्याने कापले. जिथे लोकेशन मिळाले तिथून तरुणाला रुग्णालयात हलवले.

हे सुद्धा वाचा

हे अंतर, रस्ता पाहता पोलिसांना 15 मिनिटं लागण्याची शक्यता होती. गुगलने पण तसाच अंदाज वर्तवला होता. पण पोलिसांनी युवकाचे प्राण वाचवण्यासाठी वेगाने पोलिस वाहन दामटले. पोलिस 12 व्या मिनिटाला घटनास्थळी होते. पोलिस घटनास्थळी पोहचली तेव्हा हा तरुण बेशुद्ध झाला होता. त्याला तात्काळ कटरा येथील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपाचारनंतर आता तरुणाची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुग्णालयाने सुट्टी दिली आहे.

आई-वडिलांनी झापल्याने आला राग

या तरुणाच्या हरकतींमुळे आई-वडील त्याच्यावर रागवले होते. त्यांनी त्याला चांगलेच सुनावले. यामुळे तो चिंतेत होता. रागा रागात त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी मेटामुळे हे शक्य झाल्याचे त्याच्या घरच्यांना सांगीतले आणि आई-वडिलांसह तरुणाला समज दिली. दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला. मेटाच्या सोशल मीडिया अलर्ट सेंटरने वेळीच घटनेची माहिती दिल्याने तरुणाचे प्राण वाचले. पोलिसांनी पण वेळीच मदत पोहचवली.  या नवीन तंत्रज्ञानाची आता चर्चा होत आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.