विमान टेकऑफ घेत असतानाच एक प्रवासी थेट दरवाजाच उघडायला गेला, घाबरले प्रवासी, मग काय झाले

ज्यावेळी हा भयानक प्रकार घडला तेव्हा विमान रनवेवर चालत होते. आणि कोणत्याही क्षणी ते टेक ऑफ घेण्याच्या तयारीत होते. दरवाजा उघडायला जाणाऱ्या प्रवाशाला पाहून प्रवासी प्रचंड धाबरले

विमान टेकऑफ घेत असतानाच एक प्रवासी थेट दरवाजाच उघडायला गेला, घाबरले प्रवासी, मग काय झाले
PLANEImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 5:47 PM

मुंबई : विमानात सर्व प्रवासी स्थानापन्न झाले असताना विमान उडणार इतक्यातच एक विचित्र प्रकार घडला. क्रोएशियाच्या जदरहून रयानएअर फ्लाईटमध्ये युनायटेड किंगडमच्या एका 27 वर्षीय युवकाने विचित्र प्रकार केला. त्याने आपला सनग्लास काढत सरळ दरवाजा उघडण्यासाठी तडक निघाला, त्यानंतर प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत पसरवली. त्यानंतर या ब्रिटीश मुष्टीपटूला आवरण्यासाठी जे घडले ते त्याहून भयानक घडले. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विमानातील एका विचित्र घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती रयानएअरच्या खचाखच भरलेल्या फ्लाईटमध्ये आपल्या आसनावरुन उठला. आणि खूपच अस्वस्थ अवस्थेत आपला काळा चश्मा देखील त्याने काढला. विमानाच्या क्रु मेंबरला त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा आदेश तिला. तो दरवाजाच्या दिशेने तडक निघाल्याने टेकऑफ घेणाऱ्या या विमानातील प्रवाशाची पाचावर धारण बसली. त्याने अन्य प्रवाशांना विचित्र इशारे देखील केले. या व्हीडीओत युकेच्या या व्यक्तीला ओरडताना तुम्ही ऐकू आणि पाहू शकता. दरवाजा उघडा असा आदेश देताना तो दिसत आहे. त्यानंतर दोन प्रवासी त्याला रोखण्यासाठी उभे राहीले आणि त्याला त्यांनी खाली पाडले.

व्हिडीओ येथे पाहा…

ज्यावेळी हा भयानक प्रकार घडला तेव्हा विमान रनवेवर चालत होते. आणि कोणत्याही क्षणी ते टेक ऑफ करण्याच्या तयारीत होते. विमानातील बहुतांशी प्रवासी हीडआऊट क्रोएशियाई संगीत समारंभाहून परतत होते. जूनच्या अखेरीस हा महोत्सव पाग बेटावर साजरा केला होता. या प्रवाशाला अटकाव करताना त्याने विरोध केल्याने या ब्रिटीश मुष्ठी योद्ध्याला विमानातून उतरविण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला एका अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणात अटक करण्यात आले आहे.

एअरलाईनचे प्रवक्त्याने इंडीपेंडेंटला सांगितले की, जादर हून लंडनच्या स्टॅनस्टेडला ( 30 जून ) जाण्यासाठी टेक ऑफ करण्याची तयारी करीत असताना एका प्रवाशाने गोंधळ घातल्याने हे विमान जागीच थांबविण्यात आले. या विमानाला पुन्हा सुखरुपपणे स्टॅनस्टेडहून उड्डाण घेण्यापूर्वी या प्रवाशाला पोलीसांनी विमानातून उतरवून ताब्यात घेतल्या. हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे सोपविले आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने माफी मागितली आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.