Video viral : ‘याच्या’ हौसेला मोलच नाही! 1-1 रुपया जमवत अखेर खरेदी केली आपल्या स्वप्नातली स्कूटर
Coins savings for scooter : छोट्या आनंदासाठी मोठी किंमत मोजावी लागते. आसाममधील (Assam) एक व्यक्ती स्कूटर (Scooter) घेण्यासाठी आला होता. मात्र नाण्यांनी भरलेली बॅग घेऊन तो शोरूममध्ये (Showroom) पोहोचला. ही नाणी त्याने बचत केलेली होती.
Coins savings for scooter : थेंबे थेंबे तळे साचे किंवा थेंब थेंब पाण्यानेच महासागर भरतो, असे महणतात. कधी कधी छोट्या आनंदासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पण या छोट्या छोट्या आनंदांसमोर बाकी सगळे फिके ठरते. हे सुख विकत घेण्यासाठी माणूस रात्रंदिवस मेहनत करतो. अशीच एक कथा समोर आली आहे. आसाममधील (Assam) एक व्यक्ती स्कूटर (Scooter) घेण्यासाठी आला होता. मात्र नाण्यांनी भरलेली बॅग घेऊन तो शोरूममध्ये (Showroom) पोहोचला. ही नाणी त्याने बचत केलेली होती. ज्या व्यक्तीने ही स्कूटर खरेदी केली आणि नाण्यांनी भरलेली पिशवी घेऊन शोरूममध्ये पोहोचला. तो व्यवसायाने दुकानदार आहे. यूट्यूबर हिरक जे दासने फेसबुकवर त्याचे काही फोटो पोस्ट केले होते. जेव्हा लोकांनी ही छायाचित्रे पाहिली तेव्हा त्यांना त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता वाटू लागली.
थेट गेला शो-रूममध्ये
या व्यक्तीने आपले नाव सांगितले नाही. पण स्कूटर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीने सात-आठ महिन्यांची बचत केल्याचे नक्की कळते. त्याने प्रत्येकी एक नाणे बचत केले. त्याचा व्हिडिओही यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. यानंतर, त्याने ही नाणी एका पिशवीत भरली आणि आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून थेट शोरूममध्ये गेला.
यूट्यूब, फेसबुकवर शेअर
हिरक जे दास याने यूट्यूबवर एक आसामी भाषेत एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तसेच फेसबुकवरही एक पोस्ट यासंबंधी केली आहे. त्यासोबत काही फोटोही जोडले आहे. यात आपल्याला नाणीच नाणी दिसून येत आहेत. अक्षरश: पोत्यांतून ओढत ही नाणी आणण्यात आली आहेत. थोडक्यात काय, तर हौसेला मोल नसतं, असं म्हणतात तेच खरं आहे.