Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाशी खेळ, जीव जाण्याची वेळ, वर्ध्यात सर्पमित्र मण्यारला धामण समजला आणि…

एका सर्पमित्रानं चक्क सापाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काय झालं तुम्हीच वाचा....

सापाशी खेळ, जीव जाण्याची वेळ, वर्ध्यात सर्पमित्र मण्यारला धामण समजला आणि...
व्हायरल व्हिडीओImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 7:04 PM

वर्धा: इंटरनेटवर सापांचे (Snake) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात अनेक सर्पमित्र सापांना पकडताना दिसतात, तर कधी सापांची माहिती सांगताना. मात्र, काहीजण सापांशी खेळही करतात, हा खेळ फक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि आपलं कौतुक करुन घेण्यासाठीच असतो. यात, सापांच्या संरक्षणाचा वा पर्यावरण संवर्धनाचा काहीही उद्देश नसतो. आणि असेच व्हिडीओ अनेकदा सर्पमित्रांच्या जीवावर बेततात.असाच एक व्हिडीओ (Wardha Viral Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ वर्ध्यातला आहे, जिथं एका सर्पमित्राने चक्क सापाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र हाच प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडला

घटना आहे वर्ध्यातल्या सोनेवाडीची. इथं राहणारा बबलू काकडे गेल्या काही वर्षांपासून साप पकडण्याचं आणि त्यांना निसर्गात सोडण्याचं काम करतो. बबलू साप पकडत असल्याने, त्याला जिल्ह्यातून अनेक फोन येतात आणि त्याला साप पकडण्यासाठी बोलवलं जातं.

त्याचं झालं असं, गुरुवारी सोनेवाडी परिसरात साप निघाल्याची माहिती बबलूला मिळाली. माहितीप्रमाणे बबलू सोनेवाडीतील घटनास्थळी पोहचला. तिथं पोहचल्यानंतर त्याने सापाला रेस्क्यू केलं. मात्र साप पकडताना त्याने एक घोळ केला.

हा घोळ होता, साप समजण्याचा. बबलूने या सापाला धामण समजलं, जो की एक बिनविषारी साप आहे. मात्र हा धामण नव्हता, तर हा होता मण्यार. जो भारतातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक मानला जातो.

आता धामण समजल्यानंतर बबलू बिनधास्त झाला, आणि या सापाशी खेळू लागला. काहीवेळ हा सापाशी खेळत राहिला. त्यातच सापाने त्याला दंश केला. मात्र हा धामण आहे, आपल्याला काही होणार नाही, याच भ्रमात बबलू होता.

संध्याकाळनंतर बबलूची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. मण्यारचं विष त्याच्या शरीरात पसरलेलं होतं. त्यामुळे डॉक्टरही हतबल झाले, आणि अखेर रात्री बबलूचा मृत्यू झाला.

मण्यार हा भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे, हा आकाराने लहान असतो, त्याची लांबी दीड मीटरपर्यंत असते. गडद चॉकलेटी वा काळ्या रंगावर पिवळे आडवे पट्टे असतात. हा साप निशाचर म्हणजेच रात्री बाहेर पडणारा आहे. उंदीर, घूस, सरडे, पाली, बेडूक हे त्याचे शिकार आहेत.

मण्यारचे विष हे न्युरोटॉक्सिक असते, जे तुमच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. मण्यारचे विष हे नागाहून 15 ते 20 पट जास्त धोकादायक असतं. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळणं गरजेचं आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.