VIDEO : लग्नात नवऱ्याच्या नातेवाईकाला सुचली दुर्बुद्धी, केले असे काही की नवऱ्याचा संताप अनावर झाला
नवरा आणि नवरी रिसेप्शन सदृश्य समारंभासाठी ऐटीत सामोरे जात असताना एक गडबड होते. त्यांच्या स्वागतासाठी पाहुणा असे काही करतो की नवऱ्याची फुलटू सटकते.
GROOM FIGHTING : सोशल मिडीयावर नेहमीच मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नाच्या व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होत असते. यात वधू-वरांची कधी पंचाईत होत असते, परंतू व्हिडीओ पाहणाऱ्यांचे मात्र छानपैकी मनोरंजन होत असते. असाच एक मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आफ्रीकेचा असून ज्यात एक नवरा आपल्या नव्या नवरीला घेऊन लग्न मंडपात व-हाडी मंडळींसमोर ऐटीत येत असतो. त्यात एक बुर्जुगा नवऱ्याचे स्वागत असे करतो की नवऱ्याचं टाळकंच सटकतं…
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एक लग्नाचा व्हिडीओवर खूपच मजेशीर प्रतिक्रीया आहेत. या व्हिडीओला खूपच लाईक्स मिळाल्या आहेत. यात नवरा आणि नवरी डान्स करून रिसेप्शन सदृश्य समारंभासाठी ऐटीत सामोरे जात असताना एक गडबड होते. नवरा आपल्या नवरीला घेऊन पाहुण्यांना सोमोरे जात असतानाच एक बुजुर्ग माणूस नवऱ्याची दृष्ट काढण्यासाठी खिशातून एक नोट काढून आपल्या जिभेला चिकटवून तिच नोट नवऱ्याच्या कपाळाला लावतो आणि नवराचं डोकं सटकतं…मग पुढे काय होतं ते खरं तर प्रत्यक्ष व्हिडीओत पाहा…
नवऱ्याच्या कपाळाला लावलेली ती नोट खाली सुदैवाने पडते परंतू तो इसम पुन्हा ती नोट उचलून नवऱ्याच्या कपाळाला लावायला जातो आणि एवढा वेळ राखून ठेवलेला नवऱ्याचा संयम सुटतो. आणि नवरा लग्न वगैरे विसरून सरळ लाथेने त्या पाहुण्याला उडवतो. आणि लग्नमंडपात फ्री स्टाईल कुश्तीच सुरू होते. सर्व व-हाडी मंडळी रागीट नवऱ्याला रोखण्यासाठी धावतात.
View this post on Instagram
रागीट नवऱ्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण
इस्टाग्रामवर शेअर झालेला हा व्हिडीओ आफ्रीकेच्या सोमालियाचा आहे. या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की हा व्हिडीओ व्हिडीओग्राफरने जरा समोरून शुट केला असता तर अधिक आनंद घेता आला असता. SOMALISNAPS नावाच्या खात्यावरुन शेअर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होईल.