Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पाळीव सिंहाचा चिमुकल्यावर हल्ला, थरारक CCTV व्हिडीओ, मालकावर गुन्हा

कराचीमधील गुलबर्गा शहरात ही घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या पाळीव सिंहाला घराबाहेर फिरायला घेऊन गेला होता, त्याचवेळी एक लहान मूल त्याच्याजवळ आले आणि सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. (Attack on child by lion, a thrilling CCTV video, a FIR against the owner)

VIDEO | पाळीव सिंहाचा चिमुकल्यावर हल्ला, थरारक CCTV व्हिडीओ, मालकावर गुन्हा
पाळीव सिंहाचा चिमुकल्यावर हल्ला
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 7:53 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियामध्ये दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात. काही रंजक असतात तर काही थरारक. सध्या रंजक व्हिडिओसोबतच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तनमधील आहे. घटना काहीही असो, जर मुद्दा पाकिस्तानचा असेल आपण जरा जास्तच इंटरेस्ट घेतो. सोशल मीडियाच्या जगात दोन गोष्टी निश्चित केल्या आहेत. एक म्हणजे मजेदार व्हिडिओंची मालिका, तर दुसरी पाकिस्तानची कहाणी. तसे पाकिस्तान दर दिवशी असे काहीतरी करतो, ज्यामुळे जगभरात त्यांचे हसे होते. पाकिस्तानने पुन्हा एकदा लोकांना ही संधी दिली आहे. (Attack on child by lion, a thrilling CCTV video, a FIR against the owner)

बाहेर फिरण्यास आणलेल्या पाळीव सिंहाचा बालकावर हल्ला

सामान्यत: लोकांना कुत्रा, मांजर, पोपट असे प्राणी पाळण्याची आवड असते, मात्र पाकिस्तानमधील लोक सिंहांसारखे धोकादायक प्राणी देखील पाळतात. यामुळे अशा हिंस्र प्राण्यांमुळे सामान्य लोकांना नाहक त्रास झाल्याच्या किंवा या प्राण्यांकडून हल्ला झाल्याच्या बातम्या सर्रास घडत असतात. पाकिस्तानातील अशीच एक हल्ल्याची घटना सोशम मीडियामध्ये व्हायरल होत आहे. कराचीमधील गुलबर्गा शहरात ही घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या पाळीव सिंहाला घराबाहेर फिरायला घेऊन गेला होता, त्याचवेळी एक लहान मूल त्याच्याजवळ आले आणि सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि आता तो व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार कराची शहरात 300 हून अधिक सिंह

ही घटना 14 मे रोजी घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सिंहाच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या मुलाच्या जीवाचा धोका अद्याप टळला नसल्याचे कळते. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, सिंहाच्या मालकाकडे जनावरे पाळण्याचे परमिट नव्हते. आंतराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार कराची शहरात 300 पेक्षा जास्त सिंह असल्याचा अंदाज आहे. (Attack on child by lion, a thrilling CCTV video, a FIR against the owner)

इतर बातम्या

SBI मध्ये खाते असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम करा अन्यथा सबसिडी विसरा

सिंगल चार्जमध्ये 240Km रेंज,’या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर अनेक मोठ्या बाईक फेल

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.