लवकरच संपणार पृथ्वीवरील अन्न आणि पाणी, पण असं का आणि होणार कधी? बाबा वेंगाची थरकाप उडवणारी भविष्यवाणी
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाच्या भविष्यवाणी तुम्ही चवीने वाचता, कारण त्यातील काही घटना गेल्या काही दशकात अक्षरश: खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता तिची एक भविष्यवाणी चर्चेत आली आहे. त्यात तिने पृथ्वीवरील दाणा-पाणी संपणार असल्याचा दावा केला आहे.

बाबा वेंगा ही बल्गेरियातील एक भविष्यवेत्ती होती. जन्मतःच तिची दृष्टी निसर्गाने हिरावली. पण तिच्याकडे एक गूढ शक्ती होती. या आंतरिक शक्तीने तिने अनेक भाकीतं केली. गूढ काव्याच्या स्वरुपात तिच्या अनुयायींनी ती स्थानिक भाषेत नोंदवली. सुरुवातीला अनेकांनी तिच्यासह या अनुयायींना वेड्यात काढले. पण तिने अगोदरच दावा केलेल्या काही गोष्टी घडत गेल्या तशी तिची लोकप्रियता वाढली. तिच्या गूढ काव्याचा अभ्यास सुरू झाला. त्यावरून अनेक भाकीत वर्तवण्यात आली. त्यातील अनेक खरी ठरल्याचा दावा करण्यात आला.
पृथ्वीवरील दाणा-पाणी गायब
बाबा वेंगाच्या भविष्यावाणीनुसार, वर्ष 2170 मध्ये संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळाचे संकट येईल. पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई होईल. तलाव, धरणं, नद्या, पाण्याचे सर्व स्त्रोत आटतील. पिण्याच्या पाण्याचाच नाही तर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. सगळीकडे दुष्काळाचे साम्राज्य असेल. पिकपाणी धोक्यात येईल. अन्नधान्याचा मोठा तुटवडा जाणवेल. कोट्यवधीं लोकांचा हा दुष्काळ बळी घेईल. अनेक जण अन्न-पाण्याविना तडफडून मरतील.
मानवाची करणी उलटणार
दुष्काळाचे हे संकट मानव निर्मित असेल. निसर्गावर मानवाने केलेल्या अतिक्रमणाचे परिणाम मानवाला भोगावे लागतील. हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे दुष्काळाचा खडा पहारा जगावर असेल असे भाकीत बाबा वेंगा हिने वर्तवले आहे. अनेक हवामान तज्ज्ञांनी सुद्धा पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे म्हटले आहे. जर आतापासूनच उपाय केले नाही तर येत्या 100 वर्षात परिस्थिती अनियंत्रित होईल असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे बाबा वेंगाच्या भविष्यवाणीला या घाडामोडी पूरक ठरण्याची शक्यता आहे.
जगावर खरंच दुष्काळाचे संकट?
बाबा वेंगा हिने अनेक गूढ भाकीतं केली आहेत. हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर येणार ताण यावर अनेक वैज्ञानिकांनी जगाला इशारा दिला आहे. Intergovernmental Panel on Climate Change (IPCC ) च्या एका अहवालानुसार, जागतिक तापमान वाढीचा वेग जर आवरला नाही तर 2100 पर्यंत 40 टक्के लोकसंख्येला जल संकटाला सामोरे जावे लागेल. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, 2050 पर्यंत 1.8 अब्ज लोकांना गंभीर पाणी संकटाला तोंड द्यावे लागेल. या दरम्यान योग्य उपाय योजना केल्या नाही तर जागतिक तापमानात 2°C ची वाढ दिसेल.
डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.