Baba Vanga Prediction : त्या चार भविष्यवाणी…हसण्यावर नेल्या नि झाल्या खऱ्या, भारताविषयीची पाचवं भाकीत ठरणार खरं?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीची अनेकांनी सुरुवातीला खिल्ली उडवली. पण तिच्या गूढ काव्यातील त्या चार दाव्यांनी नंतर जगात खळबळ उडवली. कारण त्या प्रत्यक्षात घडल्या आणि मग टीका करणारेच या बाईच्या अभ्यासासाठी थेट बल्गेरियाला पोहचले, असा दावा करण्यात येतो.

बाबा वेंगा ही बल्गेरियन भविष्यवेत्ता होती. ती जन्मतःच आंधळी होती. पुढे जसजशी ती मोठी होऊ लागली. तिने गूढ काव्य रचायला सुरुवात केली. या काव्यात भविष्यातील गोष्टींचा समावेश होता. सुरुवातीला तिच्या अवतीभोवतीच्या भविष्यातील नोंद तिने केली. त्याची एकच चर्चा झाली. पुढे तिचे काही अनुयायी तयार झाले. तिने त्यावेळी केलेल्या चार भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. सुरुवातीला तिला नावे ठेवणारे, हे सगळं थोतांड असल्याची बतावणी करणारे नंतर तिच्या गूढ काव्याचा शोध घ्यायला थेट बल्गेरियात आल्याचा दावा करण्यात येतो.
अविश्वसनीय भाकीतं, ज्यांनी पुढे जगाला हादरवले
बाबा वेंगा या गूढवादी भविष्यवेत्तीने अनेक भविष्यवाण्या केल्या. या गूढ काव्याचे डिकोडिंग काही जण त्यांच्या शब्दात करतात. त्यामुळे काहींचा थांगपत्ता लागत नाही. तर काहींचे व्यवस्थित विश्लेषण झाल्याने त्या समोर आल्या. ज्यावेळी या भविष्यवाण्या समोर आल्या. त्यावेळी त्याची खिल्ली उडवण्यात आली. पण पुढे आश्चर्यकारकपणे त्या सत्य ठरल्या.




1. 9/11 अमेरिकेवरील हल्ला (2001)
भविष्यवाणी – पोलादी पक्ष्यांच्या हल्ल्यानंतर अमेरिकन जुळे बंधू पडतील.
स्पष्टीकरण : अमेरिकेवर हल्ला होईल ही शक्यताच कोणी खरं मानत नव्हते. पण जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. अल कायद्याने जे घडवले. त्यानंतर या भविष्यवाणीचा संदर्भ लागला. ट्विन टॉवर्सवर विमानाची धडक देण्यात आली होती.
2. ISIS चा उदय (2014-आजपर्यंत)
संभाव्य भविष्यवाणी : “सीरियामध्ये एक मोठे इस्लामिक युद्ध सुरू होईल.”
स्पष्टीकरण : त्यावेळी काहीतरी धार्मिक चळवळ उभी राहिल असे वाटत होते. पण ISIS चा उदय झाला. आणि मध्य पूर्वेत युद्ध पेटले. त्यावेळी ही भविष्यवाणी खरी असल्याचे समोर आले.
3. कुरस्क पाणबुडी दुर्घटना (2000)
भविष्यवाणी (1980 च्या दशकात) : “कुरस्क पाण्याखाली जाईल आणि संपूर्ण जग त्यावर शोक व्यक्त करेल.”
स्पष्टीकरण : वर्ष 2000 मध्ये रशियन पाणबुडी ‘कुरस्क’ बुडाली होती. त्यात 118 नौदल अधिकारी मरण पावले होते. त्यावेळी या घटनेची खूप चर्चा झाली होती.
4. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील (2008)
भविष्यवाणी काय? : “अमेरिकेचा 44 वा राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन-अमेरिकन असेल.”
स्पष्टीकरण : बराक ओबामा हे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
5. भारत जागतिक महासत्ता बनेल (भविष्यातील भाकीत)
काय आहे भविष्यवाणी? : “भारत महासत्ता बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल.”
स्पष्टीकरण : भारत विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसणारच नाही तर जगाचे नेतृत्व करेल असे या भाकीतातून ध्वनीत होते. भारताची घोडदौड सुरू आहे. आर्थिक क्षेत्रात लवकरच भारत तिसऱ्या स्थानावर असेल.
डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.