पुणे: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या एका मराठमोळ्या रिक्षाचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बाबाजी कांबळे या रिक्षाचालकानं नटरंग चित्रपटातील जाऊद्या ना घरी वाजले की बारा या लावणीवर केलेल्या नृत्याला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. बाबाजी कांबळे यांच्या नृत्याला फेसबुकवर चांगली दाद मिळत आहे. ( Babaji Kamble Auto Driver in Baramati Lavani Dance Video Viral on Social Media)
सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा हा व्हिडीओ पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील रिक्षाचालकाचा आहे. रिक्षाचालकाचे नाव बाबाजी कांबळे असून ते बारामती शहरात रिक्षा चालवण्याचं काम करतात. बाबाजी कांबळे हे मुळचे बारामती तालुक्यातील गुणवडी गावचे आहेत. बाबाजी कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. बाबाजी कांबळे या मराठमोळ्या रिक्षावाल्याचं लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे लावणी नृत्य सोशल मीडियावर चागंलच व्हायरल झालेय.
बारामती शहरातील पानगल्ली रिक्षा स्टॉपवर रिक्षा चालवणाऱ्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकाने वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर केलं. त्याच्या मित्रांनी हे नृत्य कॅमेऱ्यात कैद करत त्याचा व्हिडीओ व्हायरल केला.. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून समाज माध्यमात लोकप्रिय ठरु लागलाय..
बाबाजी कांबळे यांनी नटरंग या मराठी चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या गाण्यावर केलेल्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेसबूक आणि इतर सोशल मीडिया वरील ग्रुपमध्ये हा व्हिडीओ शेअर केला जातोय. फेसबूक वापरणाऱ्यांकडून बाबाजी यांच्या नृत्याचे कौतूक करण्यात येत असल्याचं दिसते.
कोरोना काळातील संकट आणि मंदी या अशा विविध संकटांनी सामान्य माणसाच्या जीवनात असंख्य अडचणी असताना कष्ट करुन जगणाऱ्या व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीत किती आंनद शोधतात हे बाबाजी कांबळे यांच्या व्हायरल व्हिडीओमधून दिसून येते.
संबंधित बातम्या
( Babaji Kamble Auto Driver in Baramati Lavani Dance Video Viral on Social Media)