Video: जोरदार! जोराचा डान्स आला की असंच करायचं! जयेशभाईनं केलं, तेच या अस्वलानेही केलं
नाचणं ही एक कला आहे. पण नाचणं आनंदी होण्याचं आणि स्ट्रेस दूर करण्याचं एक खास तंत्रही आहे.
सोशल मीडियात (Social Media viral) काका नाचले, तरी बातमी होते. व्हायरल होणाऱ्या अतरंगी गोष्टींना दाद दिली नाही, तर कसं चालेल? म्हणून हटके ट्रेन्ड जपावाच लागतो. रोज नवनवे व्हिडीओ येत असतात. काही व्हिडीओ (Viral Video News) मनाला स्पर्श करुन जातात. काही चेहऱ्यावर हसू आणतात तर काही व्हायरल व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. आता असाच एक खास व्हिडीओ व्हायरल झाला. हटके डान्स (Dance video) करतानाहा हा व्हिडीओ समोर आलाय. सोशल मीडियावर तुम्ही याआधी कुत्र्याला, मांजरीला नाचताना पाहिलं असेच. पण आता अस्वलालाही नाचताना पाहून घ्या. अस्वलानं म्युझिकशिवायच जे ठुमके लगावले आहेत, ते लाजवाब आहेत. एका जंगलात आपल्याच मस्तीत नाचणारा हा अस्वल सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
योग नावाच्या एका ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. 22 लाकापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर एक लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. 2 जूनला ट्वीटरवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ अनेकांना आकर्षित करतोय.
पाहा व्हिडीओ :
Dance like nobody’s watching…???? pic.twitter.com/GoEr16oog2
— ?o̴g̴ (@Yoda4ever) June 2, 2022
नाचणं ही एक कला आहे. पण नाचणं आनंदी होण्याचं आणि स्ट्रेस दूर करण्याचं एक खास तंत्रही आहे. अनेकजण नाचायला लाजतात. काहींना नाचायचं असतं, पण वेड्या वाकड्या स्टेप्स पाहून कुणीतरी हसेल, या विचाराने अनेकजण नाचणं टाळतात.
अशावेळी या अस्वलाकडे बघा आणि शिका! नाचण्यासाठी ना म्युझिक लागतं. नाचण्यासाठी ना कोरीओग्राफर लागतो. नाचण्यासाठी नाही नृत्यकला यावी लागले. बस मनातून जोराचा डान्स यावा लागतो. जशी जोराची भूक लागते, तसाच जोराचा डान्सही यावा लागतो. जसा फायरक्रॅकर गाण्याआधी जयेशभाई नाचला होता, तितकाच तोडीस तोड नाच या अस्वलानं केलाय.
त्यामुळे जेव्हा पण मनात नाच येईल, तेव्हा कधीही मागेपुढे वळून पाहायचं नाही. कुणी बघताय का? य़ाची चिंता करायची नाही. मनमुराद नाचायचं आणि मोकळं व्हायचं.