Elephant video viral : म्हैशीचं पिल्लू भल्या मोठ्या हत्तीला नडलं, हत्तीने सुरुवातीला समजदारी दाखवली, नंतर…
सध्याच्या व्हिडीओमध्ये एका म्हैशीचं पिल्लू (Baby Buffalo) हत्तीला टक्कर देत आहे. त्यानंतर हत्तीने कशी समदारी दाखवली आहे, हे सुध्दा पाहायला मिळत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (social media) जंगलातील काही व्हिडीओ असे पाहायला मिळतात की, त्यामुळे लोकांना अधिक समाधान होतं. प्राण्यांचे चांगले व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर सध्याचा व्हिडीओ अनेकांचं लक्ष देखील खेचत आहे.सध्याच्या व्हिडीओमध्ये एका म्हैशीचं पिल्लू (Baby Buffalo) हत्तीला टक्कर देत आहे. त्यानंतर कशी समदारी दाखवली आहे, हे सुध्दा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी पिल्लू हत्तीच्या (Elephant video viral) धडक देत आहे. त्यावेळी पिल्लाची आई त्याला अडवण्याचा प्रयत्न करीत आहे.
व्हिडीओत दिसत असलेला हत्ती शांत आणि समजदार होता. समजा हत्ती बिघडला असता तर, त्या पिल्लाला खूप महागात पडलं असतं. रागात असलेला हत्ती अनेक समोर असलेली वस्तू उचलून फेकून देतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, धक्का देतात. काही व्हिडीओ लोकांचं मन जिंकणारे असतात.
हत्ती त्यांच्या रस्त्यात उभा होता. त्यावेळी तिथं अचानक एका म्हैशीचं पिल्लू पोहोचतं. म्हैशीच्या पिल्लू ज्यावेळी हत्तीला पाहतं, त्यावेळी ते हत्तीवरती हल्ला करतं. त्यावेळी हत्ती मागे सरकत राहतो. त्या म्हैशीच्या पिल्लावरती तो हल्ला करीत नाही. हत्ती आपले पाय मागे घेत आहे. त्यावेळी तिथं त्या पिल्लाची आई पोहोचते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. शेवटी आईने आपल्या पिल्ला शांत करते.
Bold baby water buffalo charges an elephant by u/secretslut991 in AnimalsBeingJerks
सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला अधिक लोकांनी लाईक सुध्दा केले आहे. सध्याच्या व्हिडीओला 3.4 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. विशेष म्हणजे त्या व्हिडीओला साडे हजार लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओला पाहून लोकांनी विविध पध्दतीच्या कमेंट दिल्या आहे.