प्रसववेदना सुरु झाल्या आणि क्रू मेंबर्स सरसावले, हजारो फूट उंचावर मुलीचा विमानातच जन्म
बंगळुरु ते जयपूर या प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या विमानातच महिलेची प्रसूती झाली आहे. (baby girl born indigo airplane bangalore jaipur flight)
जयपूर : मूल जन्मने ही अनुभूती काही औरच असते. वडील होणं किंवा आई होणं यापेक्षा जगात दुसरं सुख नाही. मात्र, पालक होणं जेवढं सुखावह वाटतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त अवघड आणि त्रासदायक गोष्ट म्हणजे मुलाला प्रत्यक्षात जन्माला घालणं असतं. प्रसवेदनेची तीव्रता किती असते हे त्या माऊलीलाच ठाऊक असते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये प्रसूती झाल्याचा बातम्या आपण नेमहीच वाचतो. प्रसूती होतानाचे अनेक चमत्काराचे किस्सेही आपण अनेकवेळा ऐकले आहेत. अशीच एक घटना जयपूरमध्ये खडली आहे. एका मिहलेची प्रसूती चक्क विमानात झालीये. (baby girl born in Indigo airlines airplane during Bangalore Jaipur flight)
प्रसववेदना सुरु झाल्या आणि क्रू मेंबर्स सरसावले
बंगळुरु ते जयपूर या प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या विमानातच या महिलेची प्रसूती झाली आहे. इंडिगोचे विमान जयपूरला जात असतानाच एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या. महिलेची प्रकृती पाहून ती कधीही प्रसूत होईल असे सांगितले जाऊ लागले. त्यानंतर विमानातील डॉक्टर आणि क्रू मेंबर्स यांना हालचाली सुरु केल्या. या महिलेची प्रसूती विमानात करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी यासाठी तयारीदेखील सुरु केली. मात्र, विमानात प्रसूतीसाठीचे संसाधनं नसल्यामुळे महिलेची प्रसूती व्यवस्थित होईल की नाही?, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण डॉक्टर आणि विमानातील क्रू मेंबर्स यांच्या चिकाटीने महिलेची प्रसूती चांगल्या पद्धतीने पार पाडली. पुरेसे संसाधनं नसूनसुद्धा या महिलेने मुलीला जन्म दिला.
A baby girl was born on board an IndiGo flight from Bengaluru to Jaipur. Baby was delivered with the help of crew assisted by a doctor on board. Jaipur airport was immediately informed to arrange for a doctor and an ambulance on arrival. Both the baby & mother are stable: IndiGo
— ANI (@ANI) March 17, 2021
डॉक्टरच्या प्रयत्नांमुळे महिला, मुलगी सुखरुप
महिलेची प्रसूती चांगल्या प्रकारे होईल की नाही, याबाबत सर्वांना शंका होती. मात्र, डॉक्टर आणि क्रू मेंबर्स यांनी पूर्ण शक्तीनीशी आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी यशस्वीपणे महिलेची प्रसूती घडवून आणली. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर लहान मुलीच्या गोड किंकाळीने संपूर्ण विमानात आनंदाचे वातावरण पसरले होते.
विमानात असलेले डॉक्टर सुबाहना नजीर यांनी महिलेच्या प्रसूतीसाठी प्रयत्न केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. विनाम जयपूरच्या विमानतळावर उतरल्यानंतर प्रसूत महिलेसह जन्मलेली मुलगी आणि डॉक्टरचे स्वागत करण्यात आले. इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी डॉ. सुबाहना यांचे आभार मानले.
दरम्यान, विमानात प्रसुती होण्याची ही काही पहिलीच घटना नाही, याआधीसुद्धा असे अनेक प्रसंग घडले आहेत. मागील वर्षी इंडिगो एअरलाईन्सच्याच विमानात दिल्ली-बंगळुरु विमानात महिलेने बाळाला जन्म दिला होता.
इतर बातम्या :
स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान खेळाडूचा मृत्यू; फोटोंमधून पाहा धोकादायक खेळ
(baby girl born in Indigo airlines airplane during Bangalore Jaipur flight)