केळीचे भाव घसरले, शेतकऱ्यांची सरकारला विनंती, राज्यात अवकाळी पाऊस शक्यता
अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यातील फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यावल : यावल परिसरातील शेतकऱ्यांचे (farmer) प्रमुख पीक असलेल्या केळीला सध्या कृषी विभागाच्या (agricultural department nashik) बोर्डावर असलेल्या भावापेक्षा जवळपास 400 ते 450 रुपयांनी कमी भाव मिळत आहे. बोडांवर केळीला रविवारी 1850 रुपये भाव असला, तरी व्यापारी मात्र 1400 रूपये भाव देत असल्याची तक्रार आहे. सध्या केळीवर मोठे अस्मानी संकट आले आहे, अशातच हे आणखी व्यापारी संकट केळी उत्पादकांवर आले आहे. काही दिवसापूर्वी केळीचे भाव (Banana rate) तीन हजार रुपये झाला होता. मात्र त्यानंतर वातावरणात बदल झाला, वादळी वारे पाऊस गारपीट यामुळे केळीचे भाव कमी झाले. केळी कापणीला आल्यावर शेतकरी व्यापाऱ्यांना विनंती करत आहे. मात्र त्याचा फायदा घेत व्यापारी कमी दरात केळीची मागणी करत आहे.
मदत मिळाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो
कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवून दिलेल्या भावात केळीची खरेदी न करता व्यापारी केळी कमी दरात खरेदी करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. छोट्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून मदत देण्याचे जाहीर केले असलं तरी अजूनपर्यंत कोणतीही सुरुवात झालेली नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्पादक शेतकऱ्यांना माहिती दिली. मदत मिळाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो, अशी माहिती केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. केळी लागवडीला रासायनिक खते, पाणी, वीज, मजुरी, वाहतूक खर्च रोप लागवड खर्च रोप लागवडीपासून तर कापणीपर्यंत हजारो खर्च सरासरी उत्पन्नाच्या 75 टक्के इतका खर्च आहे.
सरकारी मदतीच्या अपेक्षा शेतकऱ्यांना आहे
अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यातील फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सरकारी मदतीच्या अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.