VIDEO | कडक उन्हात अनवाणी पायाने खुर्चीच्या साहाय्याने चालत वयोवृध्द महिला पेन्शन घेण्यासाठी बँकेत पोहोचली, मग काय झालं पाहा व्हिडीओत
Odisha News | या व्हिडीओ ओडिशा राज्यातील असल्याचा दावा एका वेबसाईटने केला आहे. त्या महिलेचं वय ७० आहे. त्या महिलेचं नाव सुर्या हरिजन आहे. ती महिला अनवाणी पायाने चालत पेन्शन घेण्यासाठी निघाली आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक वेगळ्या कारणासाठी व्हायरल झाला आहे. असे व्हिडीओ यापूर्वी सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ ओडिसा (Odisha) राज्यातील नबरंगपुर परिसरातील असल्याचा दावा एका वेबसाईटने केला आहे. त्या वयोवृध्द महिलेचं वय ७० असल्याचं सांगितलं जात आहे. त्या महिलेचं नाव सूर्या हरिजन (Surya Harijan) असं आहे. ती महिला अनवाणी पायाने चालत खुर्चीच्या साहाय्याने पेन्शन घेण्यासाठी निघाली आहे. सद्या देशात अनेक ठिकाणी कडक उन्हं असल्यामुळे चटके बसत आहेत. इतक्या उन्हात बँकेत निघालेल्या महिलेचं व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
त्या वयोवृध्द महिलेला चालता येत नाही. त्यामुळे त्या महिलेने आपल्यासोबत एक प्लास्टिकची खुर्ची घेतली आहे. त्याचा आधार घेऊन ती महिला रस्त्याने रखरखत्या उन्हातून चालत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाल्यानंतर तिथल्या बँक व्यवस्थापकांनी सुध्दा एक प्रतिक्रिया दिली आहे. एसबीआई झारीगांव शाखेतील बँकेचे व्यवस्थापक म्हणत आहेत की, त्यांच्या पायाचे अंगठे तुटले आहेत. त्यामुळे त्या महिलेला पैसे काढत असताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. लवकरचं आम्ही यावर काहीतरी उपाय काढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
#WATCH | A senior citizen, Surya Harijan walks many kilometers barefoot with the support of a broken chair to reach a bank to collect her pension in Odisha’s Jharigaon
SBI manager Jharigaon branch says, “Her fingers are broken, so she is facing trouble withdrawing money. We’ll… pic.twitter.com/Hf9exSd0F0
— ANI (@ANI) April 20, 2023
दुसऱ्या बाजूला आणखी एक ट्विट व्हायरल झालं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या अजिबात व्हायरल करु नका. कारण वृद्ध महिलेच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, ती बँकेत जात नव्हती. उलट ती आपल्या मुलीच्या घरी जात आहे.
VIDEO | Surya Harijan, a 70-year-old woman from Odisha’s Nabarangpur, had to walk several kilometres barefoot under the scorching sun, using a broken chair as support, to collect her pension money. pic.twitter.com/omWpdUcdVb
— Press Trust of India (@PTI_News) April 20, 2023
देशात अनेक राज्यात कडाक्याच उन्हं पडलं आहे. अनेक राज्यात इतकी गर्दी पडली आहे की, अनेकांना त्याचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. अशा अवस्थेत एक वयोवृध्द महिला आपल्या घरी अनवाणी पायाने निघाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्या महिलेची मजबूरी असल्यामुळे त्यांना खुर्चीचा आधार घ्यावा लागत आहे.