VIDEO | चमच्याने बनवला सुंदर मोर, या कलाकाराची कलाकृती पाहून तुम्हीही म्हणाल…
viral video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने चमच्यापासून मोर तयार केला आहे. लोकं त्या व्यक्तीचं कौतुक करीत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर लोकांना जो व्हिडीओ आवडतो. तोचं व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल (viral video) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याचा व्हिडीओ एका कलाकाराचा आहे. त्याने घरात असलेल्या चमच्यापासून मोर तयार केला आहे. विशेष म्हणजे तो कशा पद्धतीने मोर तयार करीत आहे. हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. काही कलाकार अशा गोष्टी तयार करतात की, लोकांचा डोळ्यावर विश्वास बसत नाही. सध्याचा व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर (trending video) अधिक व्हायरल झाला आहे.
या कारणामुळे व्हिडीओ व्हायरल
ट्विटरवरती Massimo नावाच्या खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक कलाकार वेगवेगळ्या चमच्यांपासून सुंदर असा मोर तयार करीत आहे. विशेष म्हणजे त्या कलाकराने वेगवेगळ्या पध्दतीचे चमचे कापून मोर तयार केला आहे. त्या मुर्तिकाराचं नाव मिशेल टी. कोस्टा असं आहे. ती व्यक्ती अनेक वस्तूंपासून मुर्ती तयार करीत आहे. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, हा मोर चमच्यापासून तयार केला आहे.
Sculptor and ‘metal alchemist’ Michel T. Costa creates sculptures from unexpected materials and objects. This is a peacock made with spoons and forks.
[more creations: https://t.co/uED9DxNrBX]pic.twitter.com/q9t1Gqq2BK
— Massimo (@Rainmaker1973) August 3, 2023
व्हिडीओचं कौतुक करताना नेटकऱ्यांची दमछाक
सध्याचा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरती 40 हजार लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केली आहे. लोकांनी त्या मुर्तीकाराचं तोंडभरून कौतुक केलं आहे. एक नेटकरी म्हणतो की, ‘हे खूप मनोरंजक आहेत. कोणी कचरा म्हणून फेकून देतात, तर कोणी त्यातून अप्रतिम कलाकृती बनवतात. दुसऱ्या एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, ही खऱ्या कलाकाराची नजर आहे. त्यांच्यामुळं अशा व्यक्ती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या एका व्यक्तीनं चमचा मॅन असं म्हटलं आहे. आणखी एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, काय कमाल आहे आणि खूपचं सुंदर आहे.