12 तास चप्पल घाला, 4 लाख कमवा; ‘ही’ कंपनी देतेय घर बसल्या जॉब
पण आता तुमच्याकडे घरबसल्या लाखो रुपये कमवण्याची संधी चालून आली आहे. (bedroom athletics Company Offer Slipper Tester Application Job)
नवी दिल्ली : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली. पण आता तुमच्याकडे घरबसल्या लाखो रुपये कमवण्याची संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला काहीही मेहनत करावी लागणार नाही. लाखो रुपये कमवण्यासाठी फक्त तुम्हाला चप्पल घालावी लागणार आहे. आश्चर्य वाटतं ना, पण हे खरं आहे. (bedroom athletics Company Offer Slipper Tester Application Job)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका चप्पल कंपनीत जॉब असल्याची जाहिरात व्हायरल होत आहे. यासाठी तुम्हाला या कंपनीच्या चप्पल फक्त घरबसल्या ट्राय करायच्या आहे. ही चप्पल घातल्यानंतर तुमचा अनुभव कसा आहे? ती कम्फर्टेबल आहे का? याची प्रामाणिकपणे उत्तर द्यायची आहेत. यासाठी कंपनी तुम्हाला वर्षाला 4 लाख 20 हजार रुपये देणार आहे. म्हणजे महिन्याला साधारण 35 हजार रुपये मिळणार आहे.
Bedroom Athletics या कंपनीने Slipper Tester या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या जाहिरातीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीने गेल्यावर्षीही अशाप्रकारे Slipper Tester या पदासाठी अर्ज मागवले होते. त्यावेळीही या जाहिरातीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.
सध्या प्रसिद्ध केलेली ही जाहिरात दोन पदांसाठी आहे. एक महिला आणि एक पुरुष अशा दोन व्यक्तींसाठी ही जाहिरात आहे. या कंपनीने दिलेल्या जाहिरातीनुसार, तुम्हाला फक्त कंपनीला चप्पल घालून तुमचा अनुभव शेअर करावा लागणार आहे. कारण तुमच्या अनुभवाच्या आधारे कंपनी चांगले काम करु शकेल.
ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर
या नोकरीसाठी तुम्हाला महिन्यातील फक्त दोन दिवस चप्पल टेस्टिंग करावी लागेल. यात तुम्हाला 12 तास चप्पल घालून राहावं लागेल. तसेच काही निवडलेल्या उमेदवारांना कंपनीचे काही नाईट वेअर्सचीही टेस्टिंग करावी लागेल.
जर तुम्हाला ही नोकरी करायची असेल, तर तुम्हाला www.bedroomathletics.com या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. यात तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर, मेल आयडी यासारखी सर्व डिटेल्स द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला 100 शब्दात तुम्ही या जॉबसाठी कसे परफेक्ट आहात? कंपनीने तुम्हाला नोकरी का द्यावी, याची माहिती द्यावी लागणार आहे. जर तुमचे उत्तर बरोबर असेल, तर कंपनी तुम्हाला ही नोकरी ऑफर करेल. (bedroom athletics Company Offer Slipper Tester Application Job)
संबंधित बातम्या :
VIDEO | सिद्धटेकच्या मंदिराबाहेर गणेशभक्तांशी हस्तांदोलन, गोंडस कुत्र्याचा व्हिडीओ पाहिलात?
Vedic Paint | शेणा-मातीच्या काल्याला आधुनिक टच, गडकरींच्या हस्ते वैदिक रंगाचं लाँचिंग