Video : वरमाळा गळ्यात घालण्यापूर्वीच वधूने केलं नको ते, नवरदेवाची मानही शरमेने झुकली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ लग्नाचा असून वधुच्या कृतीमुळे नेटकरी आवाक् झाले आहेत.
मुंबई : सोशल मीडिया वापरताना आपल्याला रोज कोणता कोणता व्हिडीओ दिसतो. स्क्रोल करताना असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ एका लग्नातला असून वधुच्या कृतीमुळे सर्वच जण आवाक् झाले आहेत. शक्यतो लग्नामध्ये वधु मान खाली घालून असते असं आपण पाहतो. पण व्हायरल व्हिडीओतील वधु एकदम बिनधास्त अंदाजात होती. तर वर शरमेने मान खाली घालून झुकल्याचं दिसत आहे. वरमाळा विधीत वधुने तर कहरच केला. वराच्या गळ्यात वरमाळा घालण्यापूर्वीच वराच्या गाळावर चुंबन घेतलं. त्यामुळे वराला लाजल्यासारखं झालं.
काय आहे व्हिडीओमध्ये
व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की, वधु आणि वर दिसत आहे. वरमाळा घालण्याचा विधी सुरु होतो. तेव्हा वराच्या गळ्यात माळ घालण्यापूर्वी त्याच्या गाळावर चुंबन घेते. यावेळी वराचा फेटा बाजूला होतो. तेव्हा उपस्थिती वऱ्हाडीपैकी एक जण फेटा व्यवस्थित करतो. त्यानंतर वर वधुच्या गळ्यात वरमाळा घातलो. @memecentral.teb या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली नेटकरी आपल्या अंदाजात कमेंट्स देत आहेत. काही सेकंदातच या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, “लग्नात असे प्रकार भविष्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.” दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “लग्नापूर्वी असं काही करण्याची आवश्यकता नाही.”