बेंगळुरू: बेंगळुरू शहर आयटी हब म्हणून ओळखले जाते आणि शहरातील सर्वसामान्य जनता किती तंत्रज्ञान प्रेमी आहे, याबद्दल बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात. ट्विटरवर एका व्यक्तीने लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, शेजाऱ्याकडून त्याला एक चिठ्ठी मिळाली आणि त्याने आपली कार त्याच्या ठिकाणी पार्क करू नये अशी विनंती केली. तंत्रज्ञान तज्ञ सुभाष दास यांनी आपल्या कारच्या खिडकीवर चिकटवलेल्या शेजाऱ्याच्या चिठ्ठीचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलं होतं, “हाय, कृपया तुमची गाडी इथे पार्क करू नका!”
या चिठ्ठीत पुढे लिहिले आहे की, आम्ही तुम्हाला असे न करण्याची विनंती आधीच केली होती. कृपया समजून घ्या की आम्ही 2000 पासून या भागात राहत आहोत आणि आमच्याकडे 2 कार आहेत. त्यामुळे पार्किंगसाठी अधिक जागेची गरज आहे. कृपया आपल्या पूर्वीच्या पार्किंगमध्ये परत जा. चांगले आणि सहकार्य करणारे शेजारी बनूया,’ असे म्हणत त्यांनी ‘आपला शेजारी’ अशी स्वाक्षरी केलीये.
Found this in Koramangla today. Bengaluru – the city of epic content@peakbengaluru pic.twitter.com/NoFelvA6bw
— Subhasis Das (@inframarauder) June 27, 2023
दास यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मला वाटत नाही की इतरत्र इतक्या नम्रपणे लोक आपली चिंता व्यक्त करताना दिसतील. एका युजरने कमेंट केली की, “बेंगळुरूचे लोक सुंदर आहेत.” दुसऱ्या युजरने लिहिले, “एक चांगला शेजारी व्हा.” तिसऱ्या युजरने लिहिले, “जर गुडगावमध्ये असे झाले असते तर शेजाऱ्याने बेसबॉल बॅटने आधीच विंडशील्ड तोडली असती.