सावधान! काेराेनाच्या नविन लक्षणांबद्दल साेशल मिडीयावर पसरविला जाताेय चूकीचा संदेश, काय आहे ताे मेसेज?
सोशल मीडियावर सुरू असलेले हे मेसेज पूर्णपणे चुकीचे आहेत. या प्रकारातून फुफ्फुसांना कोणतीही हानी होत नाही.
मुंबई, चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढत आहेत. भारतातही सरकार अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांच्या मेसेजेसचा (Corona Fake Messages) वर्षाव सुरू आहे. असे अनेक फेक मेसेज सुरू आहेत, ज्यामध्ये ओमिक्रॉनच्या सब-व्हेरिएंट्सबद्दल (Omicron Sub-variant) चुकीची माहिती दिली जात आहे. नवीन प्रकार प्राणघातक आणि अधिक संसर्गजन्य असल्याचे खाेटे दावे केले जात आहेत. उपचार आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. या बनावट संदेशांमध्ये असे म्हटले आहे की, कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार अतिशय धोकादायक आहे आणि ते योग्यरित्या शोधणे सोपे नाही.
नवीन प्रकाराच्या लक्षणांबद्दलही चुकीची माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या प्रकारात खोकला नाही आणि ताप नाही. याशिवाय सांधेदुखी, डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी, निमोनिया आणि भूक न लागणे ही त्याची सौम्य लक्षणे आहेत. सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जात आहे की, ओमिक्रॉन प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा 5 पट जास्त धोकादायक आहे आणि मृत्यू दर जास्त आहे. त्याची लक्षणेही दिसत नाहीत. संसर्ग झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावली आहे.
ओमिक्रॉनबद्दल दिली जाणारी चुकीची माहिती अशा प्रकारे आहे
- फुफ्फुसांवर परिणाम करणारे व्हायरस
- काही रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेमध्ये न्यूमोनियाची पुष्टी होत आहे.
- नेजल स्वॅबने केलेली चाचणी निगेटिव्ह येत आहे.
- हा व्हेरीएन्ट समाजात सहज पसरू शकतो
- या व्हेरीएन्टमुळे फुफ्फुसांचे नुकसान होत आहे
- गंभीर न्यूमोनिया आणि श्वसन समस्या उद्भवू शकतात
- आता कोविडची येणारी लाट खूप धोकादायक असेल
- ओमिक्रॉन प्रकार सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आहे
- हा व्हेरीएन्ट टाळण्यासाठी खुल्या ठिकाणीही 1.5 मीटरचे अंतर ठेवावे लागेल.
- केवळ डबल-लेयर मास्क संरक्षित करेल
अफवांकडे दुर्लक्ष करा
डॉ. अजय कुमार म्हणतात की Omicron चे sub-variant bf.7 चे कोणतेही गंभीर प्रकरण भारतात आलेले नाही. सोशल मीडियावर सुरू असलेले हे मेसेज पूर्णपणे चुकीचे आहेत. या प्रकारातून फुफ्फुसांना कोणतीही हानी होत नाही. हा प्रकार भारतात अनेक महिन्यांपासून अस्तित्वात आहे, परंतु लोकांना फक्त फ्लूसारखी लक्षणे दिसत आहेत. अशा परिस्थितीत अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही. लोकांना फक्त सल्ला दिला जातो की त्यांनी कोविडपासून बचावाचे नियम पाळावेत आणि खबरदारी घ्यावी.