सावधान! तुमच्यासोबतही असं घडू शकतं, नव्या घरात शिफ्ट झालं जोडपं, भिंतीला होतं छोटं छिद्र, सत्य समोर येताच फुटला घाम
जेव्हा आपण एखाद्या नव्या घरात राहायला जातो, तेव्हा आपण त्या घरातील प्रत्येक काना-कोपऱ्याची तपासणी करतो. याचदरम्यान एका कपल सोबत एक विचित्र प्रकार घडला आहे.
जेव्हा आपण एखाद्या नव्या घरात राहायला जातो, तेव्हा आपण त्या घरातील प्रत्येक काना-कोपऱ्याची तपासणी करतो. मात्र तरी देखील काही गोष्टी या आपल्या नजरेस पडत नाहीत, असाच काहीसा प्रकार एका वृद्ध दाम्पत्यासोबत घडला आहे. ज्यांनी नुकतंच आपलं घर शिफ्ट केलं होतं. त्यांनी जेव्हा आपलं घर दुसरीकडे शिफ्ट केलं तेव्हा नव्या घरात असलेल्या त्या रहस्यमय सत्यापासून ते अनभिज्ञ होते. त्यांच्या नातवानं हे सत्य जगासमोर आनलं.
मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार जेव्हा त्यांचा नातू हा आपल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी त्यांच्या नव्या घरी गेला होता. तेव्हा त्याला त्या नव्या घरात असं काही दिसलं की त्यामुळे त्याच्यामधील जीज्ञासा जागृत झाली. त्या गोष्टीकडे त्याच्या आजी-आजोबांचं कधी लक्षही गेलं नव्हतं.त्यांना कधीच असं वाटत नाही के हे सर्व आपल्यासोबत देखील घडू शकतं.त्यांच्या नातवानं याबाबत रेडिटयवर पोस्ट केली आहे. त्यावर आता लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
घराच्या भिंतीला रहस्यमय छिद्र
मुलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, तो त्या दिवशी आपल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी गेला होता. त्याचे आजी आजोबा काही दिवसांपूर्वीच त्याचं राहातं घर सोडून नव्या घरात राहण्यासाठी आले होते. जेव्हा हा मुलगा त्याच्या आजी आजोबांना भेटण्यासाठी त्यांनी खरेदी केलेल्या नव्या घरी गेला तेव्हा त्याचे त्याच्या चुलत भावासोबत भाडंण झालं. दोघांमध्ये भांडण सुरू असतानाच अचाक त्याचा हात चुकून तेथे असलेल्या एका भिंतीला लागला. त्यानंतर त्या भिंतीचं प्लास्टर खाली कोसळलं. त्यानंतर त्यांनी पाहिलं की त्या भिंतीला एक मोठं छिद्र आहे. जेव्हा त्यांनी त्या छिद्रामधून डोकावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तीथे एक मोठी पोकळी दिसली. तेव्हा या मुलाने आपले आजोबा आणि आपल्या चुलत भावाच्या मदतीनं ती भिंत पाडली, तेव्हा त्यांना आत जे दिसलं ते पाहून धक्काच बसला.
नेमकं काय दिसलं?
त्यांना त्या भिंतीच्या मागे एक मोठी खोली दिसली, त्या खोलीमध्ये त्यांना विविध प्रकारच्या झाडांची रोपं दिसली. तसेच शेतीशी संबंधित काही यंत्र आणि पुस्तक दिसले. या पुस्तकांमध्ये अत्याधुनिक पद्धतीनं शेती कशी करावी याबाबत अनेक लेख होते. या मुलानं लिहिल्या पोस्टवर आता सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.