आजच्या युगात लोक साहसी जीवन जगण्यासाठी डोंगर, जंगल आणि समुद्राच्या परिसरात जातात. तिथल्या लोकांसोबत हँग आउट करायला आवडतं आणि त्यांना साहसी गोष्टींशी संपर्क साधायचा असतो. मात्र, अनेकवेळा लोक जीव धोक्यात घालून अशा धोकादायक ठिकाणी जातात. सोशल मीडिया(Social Media)वर असे अनेक व्हिडिओ (Video) आहेत, ज्यामध्ये लोकांना हे क्षण जगावेसे वाटतात आणि बिनधास्तपणे आनंद लुटायचा असतो. व्हेल(Vel), शार्क (Shark) यांसारखे धोकादायक मासे समुद्रात दिसतात, पण काही वेळा नद्यांमध्येही मोठे मासे दिसतात.
शार्कच्या लांबीएवढा मोठा मासा
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शार्कच्या लांबीएवढा मोठा मासा नदीत पोहताना दिसत आहे. स्वच्छ पाण्याखाली तो मासा शांतपणे पोहतो आणि पुढे जातो. यादरम्यान काही पर्यटक तेथून जात असताना त्यांना सर्वात धोकादायक बाब दिसली. त्याने हा महाकाय मासा पाहिला आणि शांतपणे त्याला जाऊ दिलं. मासे पाहिल्यानंतर पर्यटकाच्या चेहऱ्यावर हास्य तरळलंच पण त्यांची हवाही टाइट झाली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच तो कुठला आहे, याचा शोध सुरू झाला.
अमेरिकेतल्या फ्लोरिडा होते कयाकिंग
हा व्हिडिओ अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथला आहे. इथं weeki wachee नावाचं ठिकाण आहे, जिथं पर्यटक त्याचा आनंद घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाइन बुकिंग करावं लागेल. इथं कयाकिंग करण्यासाठी तुम्हाला थोडासा खिसा रिकामा करावा लागेल, कारण प्रौढ व्यक्तीला 60 डॉलर म्हणजेच सुमारे 4500 रुपये मोजावे लागतील, तर मुलांना 50 डॉलर म्हणजेच 3700 रुपये मोजावे लागतील. हा व्हिडिओ thebucketlistglobe नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.