शिक्षणाचा गर्व नाही अन् कामाची लाज नाही, उच्चशिक्षित तरूणीने टाकली चहाची टपरी
बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यातल्या प्रियांका गुप्ताने नोकरी न करता चहाची टपरी सुरू केलीय. प्रियांकाने उच्च शिक्षण घेतलं. तिनं महात्मा गांधी काशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे बँकेत नोकरी मिळावी म्हणून तिने परीक्षा दिली पण तिला यश आलं नाही. मग तिने एक निर्णय घेतला अन् चर्चेचा विषय बनली. पाटणा महिला महाविद्यालयासमोर तिने एक चहाची टपरी टाकली.
मुंबई : आपण चांगलं शिक्षण घ्यावं चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. पण अनेकदा आपण उच्च शिक्षण घेऊनही आपल्याला हवी तशी नोकरी मिळत नाही. अश्यावेळी मन खचायला होतं. पण अश्या परिस्थितीही काही लोक खचत नाहीत. तर मोठ्या हिमतीने उभे राहतात. नवा पर्याय स्विकारतात. यासाठी व्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी आर्थिक गणितं जुळवण्यासाठी मोठं धाडस लागतं. असाच धाडसी निर्णय घेतलाय एका उच्चशिक्षित तरूणीने… बिहारमधल्या (Bihar) पूर्णिया (Purnia) जिल्ह्यातल्या प्रियांका गुप्ताने (Priyanka Gupta) नोकरी न करता चहाची टपरी (Tea Stall) सुरू केलीय. याची सध्या सोशल मीडियावर (Viral News) जोरदार चर्चा आहे.
बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यातल्या प्रियांका गुप्ताने नोकरी न करता चहाची टपरी सुरू केलीय. प्रियांकाने उच्च शिक्षण घेतलं. तिनं महात्मा गांधी काशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे बँकेत नोकरी मिळावी म्हणून तिने परीक्षा दिली पण तिला यश आलं नाही. मग तिने एक निर्णय घेतला अन् चर्चेचा विषय बनली. पाटणा महिला महाविद्यालयासमोर तिने एक चहाची टपरी टाकली. तिच्या या निर्णयासाठी अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. तिच्याकडे महाविद्यालयीन तरूण तरूणी चहा घेण्यासाठी येतात.
Bihar: Priyanka Gupta, an economics graduate sets up a tea stall near Women’s College in Patna
I did my UG in 2019 but was unable to get a job in the last 2 yrs. I took inspiration from Prafull Billore. There are many chaiwallas, why can’t there be a chaiwali?, she says pic.twitter.com/8jfgwX4vSK
— ANI (@ANI) April 19, 2022
प्रियांकाने अहमदाबादमधले चहाविक्रेते प्रफुल्ल बिलोर यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. ती त्यांना आपला आदर्श मानते. बिलोर यांनी एमबीए करूनही चहाचे दुकान सुरू केलं आणि आता त्यांचा मोठा व्यवसाय आहे. प्रफुल्ल बिलोर ग्राहकांना चहाच्या स्टॉलकडे आकर्षित करण्यासाठी ‘पीना ही पडगा’ आणि ‘सोच माट… चलू कर दे बस’ सारख्या मनोरंजक पंचलाईन वापरतात. त्यामुळे अधिक ग्राहक त्याच्या दुकानाकडे आकर्षित होतात.
व्यावसाय सुरू केल्यानंतर प्रियांकाने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी 2019 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. गेली दोन वर्ष मी बँकेच्या स्पर्धा परिक्षेत पास होण्याचा प्रयत्न करत होते. पण मला त्यामध्ये यश मिळालं नाही. म्हणून मी चहा “विकण्याचा निर्णय घेतला. देशात अनेक चहावाले आहेत. मग एक मुलगी चहावाली का होऊ शकत नाही?”, असं प्रियांका म्हणाली.
संबंधित बातम्या