VIDEO | गावाकडं निघालाय का? दोन बॅगा घेऊन जायचा जुगाड व्हिडीओत पाहा
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईकसोबत सुटकेस घेऊन निघाली आहे. ज्यावेळी लोकांनी हा प्रकार पाहिला त्यावेळी त्यांना सुध्दा एक प्रकारचा धक्का बसला आहे.
मुंबई : काहीवेळेला डोक्याचा योग्य वापर केला, तर तुमचं काम एकदम हलकं (Jugaad video) होऊन जातं. त्याचबरोबर त्या कामाचं कौतुक देखील केलं जातं. आपण केलेल्या जुगाडामुळे आपला वेळ आणि श्रम सुध्दा वाचतं असं अनेकदा दिसून आलं आहे. सध्याचा एक व्हिडीओ (latest viral video) सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. सध्या टेक्नॉलॉजीवर आधारिक अनेक जुगाड पाहायला मिळतात. कुणी काहीही करतं असल्याचं पाहायला मिळत आहे. एका बाईक (bike and suitcase video) चालकाने केलेला जुगाड लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे.
जेव्हा तुम्हाला कुठं फिरायला जायचं असतं, त्यावेळी सुरुवातीला तुमच्या मनात पॅकिंगचा विचार येतो. त्या बॅगेत काय-काय ठेवायचं आणि कोणत्या गोष्टी गरजेच्या नाहीत, हे त्यावेळी लक्षात येत नाही. हे सगळं करीत असताना जड झालेली बॅग कशी घेऊन जायची असा विचार सतत डोक्यात येतो. समजा तुम्हाला सुध्दा अशा प्रकारची समस्या येत असेल, तर तुम्ही हा व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा एकदम बरं वाटेल एवढं मात्र नक्की.
लोकांनी व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळत आहे. बाईक सोबत सुटकेल स्पीडने धावत आहे. दोन्ही सुटकेस एकाचवेळी धावत आहेत. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या लोकांनी व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता लोकांनी व्यक्त केली आहे.
Rickshaw wala: Sahab luggage ka extra lagega
Indians: Bhag yaha se 👇pic.twitter.com/SVPZMJgGLk
— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) August 27, 2023
कसले-कसले जुगाडबाज लोकं आपल्या देशात आहेत
हा व्हिडीओ एक्सवरती @RoadsOfMumbai च्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत. एका व्यक्तीने लिहीले आहे की, कसले-कसले जुगाडबाज लोकं आपल्या देशात आहेत. दुसरा एक नेटकरी म्हणत आहे की, आपल्या आयुष्याची गाडी कोणत्याही लॉजिकने चालत नाही, तर ती एका जुगाडने चालते. त्याचबरोबर अनेक लोकांनी त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत.