तापवलेल्या दुधाचं हे असं काय झालं? Bhopalमधला ‘हा’ Video होतोय Viral
Boiled milk turns into rubber : एक महिला गॅसवर ठेवलेले भांडे काढून त्यातून घट्ट झालेले दूध बाहेर काढते, तेव्हा ते रबरासारखे (Rubber) दिसते. दरम्यान, हे दूध एफडीएने (Food and Drug Administration) जप्त केले आहे.
Boiled milk turns into rubber : सोशल मीडियावर असे अनेक अजब गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यूझर्सना असे व्हिडिओ पाहायला आवडतात. खाद्यपदार्थांचेही असे अनेक व्हिडिओ असतात, ज्यात काहीतरी वेगळंच असतं. काहीजण खाद्यपदार्थांवर विविध प्रयोग करत असतात, मग ते असे काही विचित्र होते, की सोशल मीडियावर त्याचीच चर्चा व्हायला लागते. काहीजण अशा विचित्र प्रयोग करणाऱ्यांना शिव्या देतात, ट्रोल करतात तर काही जण नवा पदार्थ म्हणून एकदा करून पाहायला काय हरकत आहे, म्हणून विषय सोडून देतात. असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये दूध उकळताना च्युइंगमसारखे (Chewing gum) दिसत आहे. एक महिला गॅसवर ठेवलेले भांडे काढून त्यातून घट्ट झालेले दूध बाहेर काढते, तेव्हा ते रबरासारखे (Rubber) दिसते म्हणजेच आपण ज्याप्रमाणे च्युइंगम पाहतो, हे दूधदेखील अगदी त्यासारखेच दिसत आहे. दरम्यान, हे दूध एफडीएने (Food and Drug Administration) जप्त केले आहे. एफडीए अशा भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करत असते.
भांड्यात ठेवलेले दूध फुटले तेव्हा समजते
हा व्हिडिओ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आहे. भोपाळच्या अशोका गार्डन परिसरातील एका महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दूध उकळल्यानंतर फुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दूध फुटल्यानंतरही, बहुतेकवेळा त्याचा वापर करता येतो. हाच विचार करून या महिलेने भांड्यात हात घालून फाटलेले दूध काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एकतर ते दूध खूप पातळ होते आणि त्यातला फाटलेल्या दुधाचा भाग हा पूर्ण च्युइंगमसारखा झालेला होता, जो की तसा असता कामा नये.
रबरासारखे फुटलेले दूध
महिलेने फाटलेले दूध बाहेर काढले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यातले दूध अक्षरश: रबरासारखे झाले आणि च्युइंगमसारखे दिसू लागले. महिला हे दूध रबरासारखे ताणताना या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, हे दूध एफडीएने जप्त केले आहे. FDA टीमनुसार, दूध हाताळणी आणि पॅकेजिंगमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे, दुषित घटक दुधात जातात. डिटर्जंटसह युरिया, स्टार्च, ग्लुकोज, फॉर्मेलिन यांसारखे इतर दूषित पदार्थ दुधाची जाडी आणि चिकटपणा वाढवण्यासाठी तसेच ते जास्त काळ टिकवण्यासाठी भेसळ म्हणून वापरले जातात.
तापवलेल्या दुधाचं हे असं काय झालं? Bhopalमधला ‘हा’ Video होतोय Viral पाहा व्हिडिओ – #milk #Bhopal #VideoViral #Trending #viral #SocialMedia #FDA अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/obSzw7FwGT
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2022