जर हिंदी राष्ट्रीय भाषा नसेल, तुमच्या भाषेतील सिनेमे डब का केले जातात?, अजय देवगनचा किच्चा सुदीप सवाल

अजय देवगणचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे "सुदीप माझ्या भावा, तुझ्या अनुसार जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तर तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती आहे आणि कायम राहील. जन गण मन, असं ट्विट अजय देवगणने केलं आहे.

जर हिंदी राष्ट्रीय भाषा नसेल, तुमच्या भाषेतील सिनेमे डब का केले जातात?, अजय देवगनचा किच्चा सुदीप सवाल
अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटलेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 8:55 AM

मुंबई : हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं मत किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) याने मांडलं होतं. त्याच्यास या विधानावर अजय देवगन याने प्रतिक्रिया दिली आहे. “सुदीप माझ्या भावा, तुझ्या अनुसार जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तर तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती आहे आणि कायम राहील. जन गण मन, असं अजय देवगण (Ajay Devgn) म्हणाला आहे. त्याने तसं ट्विट केलं आहे.

अजय देवगणचं ट्विट

अजय देवगणचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे “सुदीप माझ्या भावा, तुझ्या अनुसार जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तर तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती आहे आणि कायम राहील. जन गण मन, असं ट्विट अजय देवगणने केलं आहे.

किच्चा सुदीप याचं उत्तर

किच्चा सुदीपने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सर, मला वाटतं की माझा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. कदाचित मी माझा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू शकेन. मी तुम्हाला भेटेन तेव्हा मी तो जरूर मांडेन. माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा किंवा वाद घालण्याचा नव्हता. मी असं का करेन?”, असं तो म्हणाला आहे.

किच्चा सुदीपचं विधान

किचा सुदीप यांने हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असं तो एका कार्यक्रमात म्हणाला. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

अजयने एका मुलाखतीत खुलेपणाने बोलण्यावर आपलं मत मांडलं. रणवीर अलाहबदियाला दिलेल्या एका मुलाखतीत अजय म्हणाला, “बर्‍याच गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला सतत तुमच्या वजनाबद्दल जागरूक राहावं लागतं, अनेकदा तुम्ही तुमच्या मनातलं मोकळेपणे बोलू शकत नाही. देशात बर्‍याच गोष्टी घडतात आणि त्या घटनांवर आम्ही बोलतो किंवा मौन बाळगण्याचा पर्याय निवडतो. कारण आमच्या मतांकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. जरी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असाल तरी ते वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. लोकांचा एक संघ तुमच्यासोबत असेल आणि आणखी एक मोठा संघ तुमच्यासोबत नसेल आणि तुम्हाला याची भीती वाटू लागते.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.