Video : हुमा कुरेशीच्या तोडीस तोड जैनिलची ‘शिकायत’, व्हीडिओ पाहून तुम्हीही चाहते व्हाल…

सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात जैनिल मेहता नावाचा तरूण त्याची 'शिकायत' करतोय. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालून केलेला डान्स अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Video : हुमा कुरेशीच्या तोडीस तोड जैनिलची 'शिकायत', व्हीडिओ पाहून तुम्हीही चाहते व्हाल...
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 4:42 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi Movie) हा सिनेमा बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेला. या सिनेमातील डायलॉग, त्यातील गाणी अनेकांच्या पसंतीला उतरली. या सिनेमातील मेरी जान, सय्या आये शाम को, झुमेरे गोरी, ढोलिडा, शिकायत ही बैठी लावणी श्रवणीय कानांचा ठाव घेतात. या गाण्यांचं सिनेरसिकांच्या मनावर गारूड आहे. यातलं शिकायत हे गाणं तर अक्षरश: वेड लावतं. या गाण्यावर जैनिल मेहता (Jainil Mehta) या तरूणाने डान्स केलाय. याचा व्हीडिओ सध्या ट्रेंडिंग आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात जैनिल मेहता नावाचा तरूण त्याची ‘शिकायत’ करतोय. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालून केलेला डान्स अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. “या गाण्यावरचा आणखी एक व्हीडिओ शेअर करेपर्यंत एक लाख व्ह्यूज होऊ द्या”, असं त्याने कॅप्शन दिलं आहे.

याच गाण्याचा त्याने दुसरा भागही प्रदर्शित केला आहे. याला त्याने उनकी नफरत से राहत बहोत है, असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीने गंगुबाई काठियावाडी या सिनेमात या गाण्यावर बैठी लावणी केली होती. जी अनेकांना आवडली. तिच्या तोडीस तोड असा हा परफॉर्मन्स जैनिलने सादर केला आहे.

जैनिलने काही दिवसांआधी एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. “माझ्यासाठी हे नृत्यदिग्दर्शन नाही, तर रस्त्यावर नाचणे आणि लोकांशी संवाद साधणे हा आहे! माझ्यासाठी हे गाणे मी किती चांगले नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन करू शकतो याबद्दल नाही तर मी संगीताचे योग्य सार किती चांगले व्यक्त करू शकतो आणि आणू शकतो! याचा आहे” ,असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘झूम रे गोरी’ या लोकप्रिय गाण्यावर तो डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आठ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

नृत्यदिग्दर्शक जैनील मेहता त्याच्या इन्स्टाग्रामवर विविध व्हीडिओ शेअर करत असतो. जैनील हे उत्कृष्ट नृत्य दिगदर्शक आहेत. जैनील मेहताने नेहा कक्करच्या गर्मी गाण्यावरही डान्स केलाय. याचाही व्हीडिओ त्याने शेअर केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.