‘या’ देशी स्पायडरमॅनला पाहिलं का? चिखल आणि पाणीही याचा रस्ता रोखू शकलं नाही, Jugaad video viral

Desi Jugaad : एका मुलाचा (Child) व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, जो मातीने भरलेल्या गल्लीत सायकलवरून (Cycle) काही वस्तू घेऊन जात आहे. आपल्यापैकी कोणी असे केले असते, तर घसरून पडलो असतो.

'या' देशी स्पायडरमॅनला पाहिलं का? चिखल आणि पाणीही याचा रस्ता रोखू शकलं नाही, Jugaad video viral
चिखल आणि पाण्यातून जुगाड करून काढला रस्ताImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 10:24 AM

Desi Jugaad : पावसाळ्याचे दिवस अजून दूर आहेत. मात्र आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे रस्त्यावर नेहमीच पाणी साठलेले असते. कधी कधी हे पाणी इतके घाण असते, की आपण त्याला पारही करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बाहेर पडल्यावर आपली पावले आपोआप थांबतात. पण रस्त्यावर कितीही चिखल आणि पाणी तुंबले तरी काम तर थांबायला नको. अडचणींवर मात करणारे अनेकजण आपल्या देशात आहेत. हे लोक असा काही जुगाड करतात, की कामही होते आणि असे व्हिडिओ पाहणाऱ्याला हसूही येते. आजकाल एका मुलाचा (Child) व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, जो मातीने भरलेल्या गल्लीत सायकलवरून (Cycle) काही वस्तू घेऊन जात आहे. आपल्यापैकी कोणी असे केले असते, तर घसरून पडलो असतो. पण या मुलाची करामत पाहा, ज्या पद्धतीने तो सायकल घेऊन जात आहे, त्याला पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत.

ट्विटरवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पाणी आणि चिखल असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलाची स्वतःची सायकल आहे, ज्याच्या मागे काही वस्तू ठेवल्या आहेत, तो चिखलमय रस्ता पाहून अजिबात घाबरत नाही, तर त्याच्या सायकलच्या मदतीने भिंतीवर चढतो आणि चिखलाचा रस्ता अगदी सहज पार करतो. 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी स्वाती लाक्रा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. याला 43 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

फिजिक्सचा प्रोफेसर!

जेव्हा लोकांनी या मुलाची प्रतिभा पाहिली तेव्हा त्यांना ते खूप आवडले. अनेक यूझर्सनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘जेथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो..! एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की हा मुलगा फिजिक्सचा प्रोफेसर आहे. तर दुसऱ्या यूझरने या मुलाला गावातील स्पायडर मॅन म्हटले आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर आपले मत मांडले आहे.

आणखी वाचा :

बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा ‘हा’ Viral video

केळाची सालं रस्त्यावर फेकणाऱ्यांना काय सांगतेय ही चिमुकली? Video viral

म्हशीशी सामना करणं सिंहाला पडलं भारी! जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, Video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.