Dangerous stunt : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना धोकादायक पद्धतीने स्टंट करण्याची आवड आहे. त्यांच्यासमोर किती धोका आहे याची त्यांना पर्वा नसते, त्यांना फक्त त्यांचा उत्साह आणि जोश दाखवायचा असतो. पर्वतावर चढणे किंवा ट्रेकिंग, स्काय डायव्हिंग, रॉक क्लाइंबिंग (Rock climbing) असे अनेक धोकादायक (Dangerous) स्टंट (Stunt) अनेकजण करत असतात. त्यांचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. पण हे करत असताना तुम्हाला धोक्याची जाणीव असलीच पाहिजे, मात्र काही लोक हा धोका पत्करतात. जगात असे लोक आहेत जे कठोर सराव करतात, त्यासाठी प्रशिक्षण घेतात, त्यानंतर ते पर्वत चढण्यात यशस्वी होतात, परंतु कधीकधी त्यांची एक चूक जीवघेणी ठरू शकते. त्याचे गंभीर परिणाम त्यांना सहन करावे लागू शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
या व्हिडिओमध्ये एक मुलगा रॉक क्लाइंबिंग करताना अक्षरश: धडकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की हा मुलगा कसा दोरीच्या साहाय्याने झुलत स्टंट करत आहे, पण त्याचदरम्यान त्याचा तोल बिघडला आणि तो दगडावर आपटतो. तो ज्या पद्धतीने पडतो त्यावरून असे दिसते, की त्याला खूप दुखापत झाली असावी. मात्र, हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने तो मुलगा पूर्णपणे बरा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ climb_world नावाने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 13 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 1.3 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 56 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आजकाल तरुणांमध्ये विविध स्टंट आणि साहसांची क्रेझ वाढली आहे. असे सर्व व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, परंतु कोणतेही आश्चर्यकारक, धोकादायक पराक्रम करताना सावधगिरी बाळगणेच चांगले. काहीही असो, पण असे धोकादायक स्टंट न केलेलेच बरे, कारण ते जीवघेणेही ठरू शकते.