Viral Video: लहान मुलाने पाण्यात मारली उडी पण, पुढे जे घडले ते अंगावर शहारे आणणारं आहे…
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये ती घटना आहे 18 मे रोजी घडलेली. अमेरिकेतील कॅन्ससमध्ये ही घटना घडली. कॅन्ससमध्ये एका 4 वर्षाच्या मुलाने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आहे. त्या लहान मुलाला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला.
मुंबईः लहान मुलांशिवाय (Kids) कोणतेही घर म्हणजे अगदी सुनसुनं वाटतं, मात्र ज्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्या घरातील मोठ्या माणसांची मात्र जबाबदारी प्रचंड वाढलेली असते. कारण ही लहान मुलं खोडकर तर असतातच पण कधी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही. लहान मुलं एका जागी क्षणभर थांबणार नाहीत, त्यामुळे अनेक जण लहान मुलांवर कायम नजर ठेवा असं ते सांगतात. कारण लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नसतो.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ (Viral Video) म्हणजे प्रत्येक पालकांसाठी एक मोठा धडा आहे. वास्तविक, व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक मूल खेळताना स्विमिंग पुलामध्ये (Swimming Pool) उडी मारते. पण त्यानंतर जे घडते ते चमत्कारापेक्षाही कमी नाही.
त्या लहान मुलाकडे पाहिले
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये ती घटना आहे 18 मे रोजी घडलेली. अमेरिकेतील कॅन्ससमध्ये ही घटना घडली. कॅन्ससमध्ये एका 4 वर्षाच्या मुलाने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आहे. त्या लहान मुलाला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. सुदैवाने, शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका 12 वर्षांच्या मुलाने स्विमिंग पूलातील त्या लहान मुलाकडे पाहिले. त्यानंतर त्यांनी तात्काळ वडिलांना याची माहिती दिली. त्याचवेळी त्या व्यक्तीने क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी मारून बुडत असणाऱ्या मुलाला वाचवले. मात्र, मुलाला पाण्यातून बाहेर काढेपर्यंत लहान मुल बेशुद्ध झाले होते.
त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की,मुलाने तलावात उडी मारली आहे. त्यानंतर एका व्यक्तीनेही त्याच्या मागून येऊन तलावात उडी मारून त्या मुलाला बाहेर काढले.
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 86 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकजणांनी त्या व्यक्तीला सुपरहिरो म्हटले आहे. त्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी मुलाला पाण्यातून बाहेर काढले नसते तर काहीही होऊ शकले असते, असे लोकांचे मत आहे.
त्याचा मुलगाही सुपरहिरो
एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, जेव्हा त्या व्यक्तीने मुलाला तलावातून बाहेर काढले, तेव्हा त्याला पडलेले पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, त्या व्यक्तीसोबत त्याचा मुलगाही सुपरहिरो आहे. तर आणखी एकाने कमेंट केली आहे की, त्या व्यक्तीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, कारण जगाला अशा माणसांचीच गरज आहे.